Pahalgam Terror Attack Highlights : पहलगाम हल्ल्याची तुलना ‘हमास’ने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी होऊ लागल्यानंतर आता पाकिस्तानविरोधात एखादी लष्करी कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढू लागल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. दिल्लीतील नॉर्थ व साऊथ ब्लॉकमध्ये दिवसभर बैठकांचे सत्र सुरू होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सूत्रधारांना धडा शिकविण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी दिवसभर बैठकांचा सपाटा लावला. तर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील जाहीर भाषणातून जगभरातील दहशतवाद्यांना सूचक इशारा दिला. भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणारे आणि त्यासाठी षडयंत्र रचणाऱ्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा करणार असल्याचं मोदी म्हणाले.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पहलगाम मध्ये हल्ला करणारे ७ दहशतवादी होते, त्यापैकी ४ ते ५ जण पाकिस्तानातील होते. त्यांच्या उर्दूच्या लहेजानुसार ते पाकिस्तानातील असल्याचं स्पष्ट झालंय, कारण ती भाषा पाकिस्तानातील एका विशिष्ट भागात बोलली जाते. तर पीर पांजर रेंजमध्ये हे दहशतवादी पळून गेले आहेत.
तर, भारताने आजपासून पाकिस्तानी नागरिकांनी देण्यात येणारी व्हिसा सेवा बंद केली आहे. सध्यस्थितीतील वैध व्हिसा २७ एप्रिलपर्यंत वैध राहतील, तर वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध राहणार आहेत. व्हिसा अवैध ठरण्याआधीच पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरूवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन संशयित आरोपींचे रेखाचित्र जाहीर केले. तीनपैकी दोन अतिरेकी हे पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अतिरेक्यांची खात्रीशीर माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
Pahalgam Terror Attack Highlights Today 24 April 2025 : पहलगाम हल्ल्यासंदर्भातील लाईव्ह अपडेट्स पाहा
पर्यटकांकडून आरक्षणे रद्द; काश्मीरमधील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तिकिटे रद्द करण्याचा सपाटा सुरू आहे. या हल्ल्याचा फटका जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात बसेल, अशी भीती व्यक्त केली जाते. पहलगाम येथील हल्ल्यानंतर काश्मीरमधील ९० टक्के आरक्षणे रद्द झाल्याची माहिती दिल्लीतील पर्यटन व्यावसायिकाने दिली.
Pahalgam Live Updates : डोंबिवलीतील अतुल मोने यांना लेकीकडून अखेरचा निरोप
डोंबिवलीतील अतुल मोने यांना लेकीकडून अखेरचा निरोप
#WATCH | Thane, Maharashtra | Last rites of Atul Mone, a resident of Dombivli who lost his life in #PahalgamTerroristAttack, were performed late last night. (23/04) pic.twitter.com/dFa6xupwSv
— ANI (@ANI) April 24, 2025
“आपण कुठे राहतो, हे…”, पहलगाम हल्ल्याबद्दल पाकिस्तानी कलाकारांच्या पोस्ट; म्हणाले, “या भीषण घटनेतील…”
म्मू- काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन भागात मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, २० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत आहे. पहलगाम हल्ल्यावर पाकिस्तानी कलाकारांनीही पोस्ट केल्या आहेत.
“लग्न, मधुचंद्र आणि सहा दिवसात पतीची हत्या, मी…”; विनय नरवाल यांची पत्नी हिमांशीने काय सांगितलं?
दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काही फोटो आणि व्हिडीओ प्रसारित झाले. त्यातला एक व्हिडीओ हिमांशी नरवाल यांचा होता. यावर हिमांशी नरवाल यांचे पती विनय नरवाल यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांनी याप्रकरणी आता प्रतिक्रिया दिली आहे.
Pahalgam Live Updates : शरद पवारांनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट
पुण्यातील संतोष जगदाळे यांचं पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांचं शरद पवारांनी सांत्वन केलं. आज ते सकाळीच या कुटुंबियांच्या भेटीला गेले होते.
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासांत भारत सोडावा लागणार आहे. याचबरोबर कोणत्याही पाकिस्तानी नागरिका भारतात प्रवेश मिळणार नाही. याचबरोबर केंद्र सरकारने १९६० चा सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तानने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करणार नाही तोपर्यंत या करारावरील स्थगिती कामय राहणार आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
ते (विदेशी दहशतवादी) ज्या उर्दू भाषेत बोलत होते ती भाषा पाकिस्तानच्या एका भागात बोलली जाते. त्यांच्यासोबत किमान दोन स्थानिक दहशतवादी असल्याचा संशय आहे,” असे सुरक्षा यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले .