Modi Government Breaking News Updates : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या दहशतवादी हल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे भारत व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान दोन्ही देशांकडून घेतले जाणारे निर्णय आणि त्याचे होणारे परिणाम यासंबंधीच्या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
India Pakistan War Tensions Live Updates 2 May 2025 : पहलगाम हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेला भारत-पाकिस्तान तणाव तसेच इतर राजकीय घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर…
Cyber Attack: भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर, हाणून पाडले सायबर हल्ल्यांचे प्रयत्न
Pahalgam Terror Attack Update : मोदी सरकारचा पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दणका, शाहबाज शरीफ यांच्या युट्यूब चॅनलवर घातली बंदी
‘Accenture’च्या कर्मचाऱ्याला भारत सोडण्याची नोटीस, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; न्यायमूर्ती म्हणाले, “तुम्ही पाकिस्तानात जन्मला…”
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबा, आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराचा हात, एनआयएच्या हाती ठोस पुरावे
“आमचं पाणी आणि आम्हीच…”, फारुख अब्दुल्ला यांचे सिंधू जल कराराबाबत महत्त्वाचं वक्तव्य
“मी अनेक वर्षांपासून म्हणत आहे की, या करारावर पुन्हा वाटाघाटी झाल्या पाहिजेत… हे आमचे पाणी आहे. आमचा देखील यामध्ये हक्क आहे. जम्मूमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. माझ्या काळात चिनाबमधून पाणी जम्मूला आणण्यासाठी आम्ही २०० कोटींची एक योजना बनवली होती, पण हे जल करारा अंतर्गत येते त्यामुळे यामधून पाणी काढता येणार नाही असे सांगून वर्ल्ड बँकेंने त्याला पाठिंबा दिला नाही. आज योग्य वेळ आहे की यावर काम सुरू केले जावे आणि जम्मूला पाणी मिळावे. आमचे पाणी आणि आम्हीच वापरत नाहीत हे कसे शक्य आहे? काहीही झालं तरी या करारावर पुन्हा वाटाघाटी कराव्या लागतील,” अशी प्रतिक्रिया जेकेएनसीचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी दिली आहे. ते पाकिस्तानबरोरचा सिंधू जल करार रद्द केल्याबद्दल बोलत होते.
Srinagar, J&K: Regarding India's suspension of the Indus Waters Treaty with Pakistan in the wake of the Pahalgam terrorist attack, JKNC President Farooq Abdullah says, "I have been saying for years that this treaty should be re-negotiated… I believe now is the right time to… pic.twitter.com/EorvCDQdN2
— IANS (@ians_india) May 2, 2025
Pahalgam Terror Attack : “दहशतवाद्यांना शोधण्यासाठी पाकिस्तान भारताला…”, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचं विधान; पहलगाम हल्ल्यावर केलं भाष्य
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तोयबा अन् ISI चे कनेक्शन उघड; NIAच्या प्राथमिक अहवालात महत्त्वाची माहिती समोर
पाकिस्तानात परतण्यासाठी लोक अटारी-वाघा सीमेवर दाखल होत आहेत. मात्र , सकाळी १०:०० वाजता दरवाजे उघडण्याची वेळ असूनही, कोणतीही हालचाल दिसून आली नाही. तसेच बीएसएफने कोणालाही सीमा ओलांडू दिले नाही.
Attari, Punjab: Families intending to return to Pakistan have started arriving at the Attari-Wagah Border. However, despite the gates being scheduled to open at 10:00 AM, no movement has been observed and the BSF has not allowed anyone to cross pic.twitter.com/SBRq7YJClq
— IANS (@ians_india) May 2, 2025
Pahalgam Attack : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचा पूर्ण पाठिंबा’, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने स्पष्ट केली भूमिका
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्राच्या सायबर सेलने नोंदवले सुमारे १० लाख सायबर हल्ले
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्राच्या सायबर सेलने सुमारे १० लाख सायबर हल्ले झाल्याचे नोंदवले आहे. हे हल्ले प्रामुख्याने पाकिस्तान, मध्य पूर्व आणि इंडोनेशियातील गटांकडून करण्यात आले. यामुळे बँकिंग आणि सरकारी पोर्टलसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील त्रुटी उघड झाल्या आहेत. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा उपाययोजना सुधारण्याची मागणी केली जात आहे.
After the Pahalgam attack, Maharashtra's Cyber Cell reported nearly 10 lakh cyberattacks, mainly from groups in Pakistan, the Middle East, and Indonesia. Vulnerabilities in critical sectors like banking and government portals were exposed, prompting calls for improved… pic.twitter.com/vo7JV255CF
— IANS (@ians_india) May 2, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून गुरूवारी पोलिसांनी श्रीनगरमध्ये २१ ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईमध्ये ज्या घरावर छापे टाकण्यात आले त्यात अल-उमर दहशतवादी संघटनेचा संस्थापक मुश्ताक अहमद जरगर उर्फ लाट्रम याच्या घरांचाही समावेश होता. १९९९ मध्ये अपहरण झालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ८१४ मधील प्रवाशांच्या बदल्यात लाट्रम आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरसह याची तुरुंगातून सुटका करण्यात आली.
१ आणि २ मे २०२५ च्या रात्री, जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूर भागातील नियंत्रण रेषेवरील चौक्यांवरून पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केल्याची घटना घडली. यादरम्यान भारतीय लष्कराच्या जवानांनी या गोळीबाराला योग्य प्रत्युत्तर दिले अशी महिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे.
During the night of 01-02 May 2025, Pakistan Army posts resorted to unprovoked small arms firing from posts across the Line of Control opposite Kupwara, Baramulla, Poonch, Naushera, and Akhnoor areas of the Union Territory of Jammu & Kashmir. Indian Army troops responded in a… pic.twitter.com/LegDm1xXXq
— ANI (@ANI) May 2, 2025