उत्तर वझिरिस्तान प्रांताच्या आदिवासी क्षेत्रात दडून बसलेल्या अतिरेक्यांविरोधात पाकिस्तानने सुरू केलेल्या अत्यंत आक्रमक मोहिमेअंतर्गत बुधवारी रात्री आणखी २३ अतिरेकी ठार झाले. रविवारपासून सुरू असलेल्या या कारवाईअंतर्गत आतापर्यंत २३५ अतिरेक्यांना मारण्यात आले आहे. सदर भागाची नाकेबंदी करण्यात आली असून अतिरेक्यांना तेथून पळून जाण्यापासून पूर्णपणे अटकाव करण्यात आला आहे. उत्तर वझिरिस्तान हा प्रांत अफगाणिस्तानच्या सीमेनज्ीाक असून तेथे सध्या सुरू असलेल्या व्यापक कारवाईद्वारे आणखी २३ अतिरेकी मारण्यात आल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली. झरतातांगी पर्वतराजी परिसरात हेलिकॉप्टरमधून ही कारवाई करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jun 2014 रोजी प्रकाशित
पाकिस्तानात आणखी २३ अतिरेकी ठार
उत्तर वझिरिस्तान प्रांताच्या आदिवासी क्षेत्रात दडून बसलेल्या अतिरेक्यांविरोधात पाकिस्तानने सुरू केलेल्या अत्यंत आक्रमक मोहिमेअंतर्गत बुधवारी रात्री आणखी २३ अतिरेकी ठार झाले.
First published on: 20-06-2014 at 04:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan 1 lakh flee tribal belt as military operation continues 23 militant killed