सीमेपलीकडील दहशतवादाला पाकिस्ताची गुप्तचर संस्था आयएसआयनेच निधी पुरवल्याचे दहशतवादी डेव्हिड हेडली याने न्यायालयाला दिलेल्या साक्षीमुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानला ‘दहशतवादी राष्ट्र’ घोषित करण्यासाठी भारताने राजनैतिक प्रयत्न करावेत अशी मागणी भाजपने केली आहे.
आपल्या भूमीवरून सत्ताबाह्य़ केंद्रे कार्यरत असल्याचे सांगून पाकिस्तान आतापर्यंत स्वत:ची जबाबदारी झटकून टाकत होता. मात्र, पाकिस्तानमध्ये कुठलेही सत्ताबाह्य़ केंद्र नसून, दहशतवादी कारवायांमध्ये आयएसआयचाच हात असल्याचे हेडलीच्या साक्षीमुळे स्पष्ट झाले आहे, असे भाजपचे राष्ट्रीय सचिव सिद्धार्थ नाथ सिंग म्हणाले. तसेच पाकिस्तानला जागतिक स्तरावर एकटे पाडावे, अशी मागणी सिंग यांनी केली.
  संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2016 रोजी प्रकाशित  
 पाकला दहशतवादी राष्ट्र घोषित करा -भाजप
आपल्या भूमीवरून सत्ताबाह्य़ केंद्रे कार्यरत असल्याचे सांगून पाकिस्तान आतापर्यंत स्वत:ची जबाबदारी झटकून टाकत होता.
Written by लोकसत्ता टीम
  Updated:   
   First published on:  14-02-2016 at 00:15 IST  
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan should be declared terrorist state says bjp