पाकिस्तानला भारताशी परस्पर सामंजस्य व सार्वभौमत्व समतेवर आधारित असे सुरळित व शांततामय संबंध हवे आहेत, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी व्यक्त केले असून भारत हा महत्त्वाचा शेजारी देश असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांना पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांच्या निवासस्थानी सांगितले की, भारत हा चांगला शेजारी देश आहे. आपल्या देशाचे शेजारी देशांशी म्हणजे भारताशी चांगले संबंध असावेत अशी आमची इच्छा आहे.
बसित यांना पाकिस्तान-भारत यांच्यातील संबंधांबाबत काही माहिती दिली. पंतप्रधानांनी त्यांना असे सांगितले की, या भागातील सर्व देशांशी पाकिस्तानचे चांगले संबंध असले पाहिजेत. दोन्ही देशांनी जम्मू-काश्मीर प्रश्न शांततामय मार्गाने सोडवावा अशी अपेक्षा शरीफ यांनी व्यक्त केली. भारताने परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा काश्मिरी विभाजनवादी नेते इस्लामाबाद येथे गेल्या ऑगस्टमध्ये सुरू होण्यापूर्वीच बसित यांना दिल्लीत भेटले होते. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध काहीसे ताणले गेले आहेत. भारत- पाकिस्तान यांनी असे म्हटले आहे की, दोन्ही देशांनी अर्थपूर्ण संवादासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2015 रोजी प्रकाशित
पाकिस्तानला भारताशी शांततामय संबंध हवेत- नवाझ शरीफ
पाकिस्तानला भारताशी परस्पर सामंजस्य व सार्वभौमत्व समतेवर आधारित असे सुरळित व शांततामय संबंध हवे आहेत,
First published on: 29-01-2015 at 12:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan want peaceful relations with india says nawaz sharif