काश्मीरप्रश्नी नेहमीच कांगावखोर भूमिका घेणाऱ्या आणि सीमा भागात नेहमीच अशांततेचे वातावरण निर्माण करणाऱ्या पाकिस्तानने काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करावे, अशी विनंती संयुक्त राष्ट्रांना केली आहे. भारत- पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, संयुक्त राष्ट्रांनी या परिसरात लक्ष घालावे, असे पाकिस्तानने सांगितले. पाकिस्तानी पंतप्रधानांचे राष्ट्रयी सुरक्षा सल्लागार सरताज अजिझ यांनी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख बान की-मून यांना पत्र लिहिले असून, कांगावखोर भूमिका घेत त्यांनी भारतावर आरोप केले.