Pakistani spy linked to CRPF Moti Ram Jat also in contact with 15 Army and govt officials : सीआरपीएफमधील सहायक उपनिरीक्षक मोती राम जाट याला तीन महिन्यांपूर्वी कथितपणे पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला संवेदनशिल गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी दिल्लीतून अटक करण्यात आले होते. दरम्यान जाट याच्या संपर्कात असलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो पाकिस्तानी अधिकारी भारतीय लष्कर, अर्धसैनिक दल आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संबंधित १५ फोन क्रमांकांच्या संपर्कात होता, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुप्तचर संस्थांनी दिली आहे.

जाट याला राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) ने २७ मे रोजी अटक केले होते. तो पाकिस्तानी एजंट्सना गोपनीय माहिती पुरवत असल्याचे समोर आल्यानंतर त्याला चौकशीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांना सोपवण्यता आले. जाट हा सीआरपीएफच्या बटालियनबरोबर पहलगाम येथे तैनात होता आणि २६ नागरिकांची हत्या करण्यात आलेला २२ एप्रिल रोजीचा दहशतवादी हल्ल्या होण्याच्या आधी अवघ्या ५ दिवसांपूर्वी त्याची बदली दिल्ली येथे झाली होती.

“टेक्निकल सर्व्हेलन्सच्या मदतीने गुप्तचर यंत्रणांनी शोधून काढले की सलीम अहमद नावाचा पाकिस्तानी ऑपरेटीव्ह फक्त जाट याच्याच संपर्कात नव्हता तर तो इतर किमान १५ फोन क्रमांकांच्या देखील संपर्कात होता. कॉल डिटेल रेकॉर्ड आणि इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड स्कॅन केल्यानंतर असे आढळून आले की, यापैकी चार क्रमांक लष्करातील कर्मचाऱ्यांचे आहेत, तर आणखी चार हे अर्धसैनिक दलातील कर्मचारी आणि उर्वरित सात क्रमांक हे केंद्र सराकराच्या वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांचे आहेत,” असे सूत्रांनी सांगितले. सध्या केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यात झालेले संवाद तपासण्यासाठी सर्व डाटाचे विश्लेषण करत आहेत असे सूत्रांनी सांगितले. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसनने दिलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर संस्थांना आढळून आले की जाट याच्याशी ज्या क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला होता ते सिम कार्ड कोलकाता येथील एका व्यक्तीने मिळवले होते आणि त्याने नंबर सक्रिय करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी लाहोर येथील पाकिस्तानी ऑपरेटिव्हशी शेअर केला होता.

आत्तापर्यंत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपासात असेही आढळून आले आहे की दोन वर्षांपेक्षा जास्त काळ जाट याने कथितपणे अनेक संवेदनशिल कागदपत्रे लाहोर येथील हँडलरला पाठवले, ज्याच्या बदल्यात त्याला १२,००० रुपयांचे नियमित पेमेंट मिळत राहिले. हा पैसा जाट आणि त्याच्या पत्नीच्या वेगेगळ्या ठिकाणी असलेल्या बँक खात्यांमध्ये डिपॉझिट केली जात होती. ही खाती दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आसाम आणि पश्चिम बंगाल अशा विविध ठिकाणी होती.

पाकिस्तानी आधिकाऱ्यांना शहजाद अशी पटवण्यात आली आहे, ज्याला मे महिन्यात कपडे, मसाले आणि कॉस्मेटिक्सच्या सीमेपलीकडे केल्या जाणाऱ्या तस्करीदरम्यान आयएसआयच्या हँडलर्सना गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसने अटक केले होते. पंजाबहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका सहप्रवाशाने कुटुंबातील सदस्याला पैसे पाठवण्यास सांगितल्यानंतर त्याने एकदा जाट याला ३,५०० रुपये ट्रान्सफर केल्याचा दावा शहजादने केला आहे. त्याला सहप्रवाशाने ऑनलाईन ट्राजिक्शन करण्यासाठी ३,५०० रुपये रोख दिले होते, असा दावाही शहजादने केले आहे,” असे सूत्रांनी सांगितले.

तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जाट याने दावा केला की त्याच्याशी चंदीगड येथील एका टीव्ही चॅनलमध्ये पत्रकार असल्याचा बनाव करणाऱ्या एका महिलेने पहिल्यांदा संपर्क साधला होता. फोन आणि व्हिडीओ कॉलमधून सतत संपर्कात राहिल्यानंतर त्याने तिच्याशी कागदपत्रे शेअर करण्यास सुरूवात केली असेही त्यांनी सांगितले. काही महिन्यांनंतर एक व्यक्ती जो कथितपणे पाकिस्तानी अधिकारी होता, त्याने या संवादाची जबाबदारी घेतली. त्याने देखील आपण महिलेचा सहकारी पत्रकार असल्याचे सांगत त्यानेही हा प्रकार पुढे सुरु ठेवला, असे सूत्रांनी सांगितलेय

जाट याने सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तैनातीसंबंधी कागदपत्रे, ऑफिशियल व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केलेले मल्टी-एजन्सी सेंटर रिपोर्ट्स, तसेच सैन्याच्या हलचाली आणि दहशतवाद्यांच्या हालचालींचे लोकेशन्स अशी अनेक गोपनिय कागदपत्रे शत्रूंना पुरवली, असेही सूत्रांनी सांगितले.