चीनपासून सुरूवात झालेल्या जीवघेण्या करोना व्हायरसचा परिणाम आता युरोपसह आशिया खंडातही वाढतोय. पाकिस्तानात गेल्या २४ तासांमध्ये करोनाग्रस्तांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. पाकिस्तानात आतापर्यंत जवळपास १९३ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माध्यमांतील वृत्तानुसार, पाकिस्तानात गेल्या २४ तासांमध्ये जवळपास १३० हून अधिक जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, मंगळवारी सकाळी पहिल्या करोनग्रस्ताचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत्यू झालेला व्यक्ती ईराणहून परतला होता. पाकिस्तानात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण सिंध प्रांतात असून येथे जवळपास १५५ जणांना करोनाची लागण झाल्याचे समजते. त्याखालोखाल खैबर पख्तूनख्वामध्ये १५, बलुचिस्तानमध्ये १०, गिलगिट बाल्तिस्तानमध्ये पाच , इस्लामाबादमध्ये दोन आणि पंजाबमध्ये एका व्यक्तिला करोनाची लागण झाली आहे.

करोना व्हायरसच्या फैलावामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीसीएलचे उपांत्य फेरीचे दोन सामने व अंतिम सामनाही पुढे ढकलला. पाकिस्तानमध्ये गेल्या एका आठवड्यापासून करोना व्हायरसचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली. पहिल्या आठवड्यात ३३ रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं, पण सोमवारपासून पाकिस्तानमध्ये करोनाग्रस्तांची आकडेवारी वाढण्यास सुरूवात झाली. गेल्या २४ तासांमध्ये जवळपास १३० हून अधिक जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पाकिस्तानात आतापर्यंत जवळपास १९३ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, भारतात आतापर्यंत जवळपास १३७ जणांना करोनाची लागण झाली असून सर्वाधिक ४१ रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistans coronavirus cases jumps to 193 sas