उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे मोठी दुर्घटना घडली आहे. द्रौपदी का डांडा-२ शिखराजवळ झालेल्या हिमस्खलनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. १८ जण अद्यापही बेपत्ता असून बचावकार्य सुरु आहे. हे सर्वजण उत्तरकाशीच्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगच्या ट्रेकिंग ग्रुपचा भाग होते. यामध्ये ३३ प्रशिक्षणार्थी आणि सात प्रशिक्षकांचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन 

घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं घटनास्थळी बचावकार्यासाठी रवाना झाली. भारतीय हवाई दलाने बचावकार्यासाठी दोन चिता हेलिकॉप्टर्स तैनात केले आहेत.

जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर आणि आयटीबीपी अधिकारी सध्या बचावकार्यात सहभागी आहेत. मुख्यमंत्री धामी यांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार “हिमस्सखलन झाल्याने नेहरु माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटचे प्रशिक्षणार्थी अडकले आहेत. मी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे लष्कराच्या मदतीने वेगाने बचावकार्य करण्यासाठी विनंती केली आहे. त्यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे”.

२३ सप्टेंबरला हा ग्रुप उत्तरकाशीसाठी रवाना झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People trapped after avalanche in uttarakhand draupadi danda 2 peak iaf indian army itbp cheetah helicopters sgy
First published on: 04-10-2022 at 15:43 IST