अर्थसंकल्पात इंधनावर सेस लावला गेल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोलच्या किंमती प्रति लीटर २.५० पैशांनी तर डिझेलच्या किंमती प्रति लीटर २.३० पैशांनी वाढल्या आहेत. शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवरची एक्साईज ड्युटी आणि सेस त्यांनी वाढवला. ज्यानंतर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच नवे दर लागू झाले आहेत.
Delhi: Petrol price hiked by Rs 2.45, now at 72.96 per litre. Diesel hiked by Rs 2.36, now at 66.69 per litre. pic.twitter.com/RWBVepbfxN
— ANI (@ANI) July 6, 2019
दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर शुक्रवार पर्यंत प्रति लीटर ७० रुपये ९१ पैसे होते जे आता ७२ रुपये ९६ पैसे झाले आहेत. दिल्लीत डिझेलचा दर प्रति लीटर ६४ रुपये ३३ पैसे होता. जो आता ६६ रुपये ६९ पैसे झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी असा लौकिक असलेल्या मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल ५ जुलैपर्यंत ७६ रुपये १५ पैसे प्रति लीटर या दराने मिळत होते जे आता ७८ रुपये ५७ पैसे प्रति लीटर झाले आहे. तर मुंबईत डिझेलचा दर शुक्रवारपर्यंत ६७ रुपये ४० पैसे प्रति लीटर मिळत होते. ज्यासाठी आता प्रति लीटर ६९ रुपये ९० पैसे मोजावे लागत आहेत.
