राज्यसभेच्या जागेसाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी बुधवारी सकाळी आपला अर्ज दाखल केला. राज्यसभेचे सदस्य असलेल्या डॉ. सिंग यांचे सदस्यत्व या महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आसाममधून पुन्हा राज्यसभेवर निवडून येण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला.
डॉ. सिंग हे विशेष विमानाने बुधवारी सकाळी गुवाहाटीमध्ये आले. त्यानंतर त्यांनी गुवाहाटीतील विधानसभेच्या सचिवालयामध्ये जाऊन आपला अर्ज दाखल केला. डॉ. सिंग पहिल्यांदा १९९१ मध्ये आसाममधून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर सलग चारवेळा ते तिथून राज्यसभेवर निवडून जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm manmohan singh files rajya sabha papers in guwahati