केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे पंजाबमधील प्रमुख नेते गजेंद्र सिंह शेखावत यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा आडवण्यात आल्याच्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. राजकीय कार्यकर्ते आणि राज्यातील पोलिसांनी एकत्र येऊन पंतप्रधान मोदींची फिरोझपूरमधील सभा होऊ दिली नाही असा आरोप शेखावत यांनी केलाय. मोदींची ही सभा पंजाबमधील सर्वाधिक गर्दीची सभा ठरली असती असा दावाही त्यांनी केलाय. पंतप्रधान मोदींची ५ जानेवारी रोजीची ही नियोजित सभा सुरक्षेच्या कारणामुळे रद्द करण्यात आलेली.
नक्की वाचा >> “कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच मोदी पंतप्रधान पद सोडून राष्ट्रपती होतील अन् योगी आदित्यनाथ पंतप्रधान होतील”
“फिरोझपूरमधील सभा ही पंजाबमधील सर्वाधिक गर्दी पहायला मिळाली असती. ही सभा सर्वाधिक गर्दी झालेली सभा ठरली असती. मात्र राजकीय कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने सभा होऊ न देण्याबरोबरच पंतप्रधान मोदींनाही सभेच्या ठिकाणी येण्यापासून रोखलं. मात्र यामुळे आम्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांचा निश्चय आणखीन दृढ झाला आहे,” असं शेखावत यांनी म्हटलंय. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: पंतप्रधानांसोबत फिरणाऱ्या SPG Security वरील एका दिवसाच्या खर्चाचा आकडा पाहिलात का?
काँग्रेसचे रणदीप सिंह सुरजेवाला, नवज्योत सिंग सिद्धू, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यासारख्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदी फिरोझपूरमधील सभास्थळी पोहचले असते तरी त्यांना रिकाम्या खुर्च्यांसमोरच भाषण द्यावं लागलं असतं, असं म्हटलं होतं.
नक्की वाचा >> सुरक्षेमधील चूक नाही तर रिकाम्या खुर्च्यांमुळे सभा न घेताच परतले मोदी; Video शेअर करत नेत्याची टीका
फिरोझपूरमधील सभेकडे लोकांनी पाठ फिरवल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येतोय. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनीही हजारो खुर्चा ठेवण्यात आलेल्या पण सभेला लोक नव्हती असा चिमटा या प्रकरणावरुन बोलताना काढला होता. त्याच पार्श्वभूमीवर शेखावत यांनी हे वक्तव्य केलंय.
नक्की वाचा >> जावेद अख्तर यांचा मोदींना टोला; म्हणाले, “काल्पनिक धोक्याबद्दल राष्ट्रपतींसोबत चर्चा केली पण २० कोटी…”
दरम्यान, मंगळवारी दिल्लीमधील भाजपाच्या मुख्य कार्यालयामध्ये पंजाबमधील काही नेत्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेस केला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात शेखावत बोलत होते. काँग्रेसचे आमदार अरविंद खन्ना, शिरोमणी अकाली दलचे गुरदीप सिंग गोशाआणि अमृतसरमधील धरमवीर सारीन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री दरदीप सिंग पुरीसुद्धा उपस्थित होते.