बंगळूरुतील मेट्रोच्या नव्या टप्प्याचे उद्घाटन; पंतप्रधान मोदी यांचा कर्मचारी, नागरिकांशी संवाद

मेमध्ये होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

pm narendra modi inaugurate new metro line
मोदी यांचा कर्मचारी, नागरिकांशी संवाद

बंगळूरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे शनिवारी मेट्रो प्रकल्पाच्या व्हाइटफिल्ड (कादुगोडी) ते कृष्णराजपुरमदरम्यानच्या १३.७१ किलोमीटर टप्प्याचे उद्घाटन केले. या प्रकल्पासाठी चार हजार २४९ कोटी खर्च आला असून, या टप्प्यात १२ स्थानके आहेत. या वेळी मोदींनी ‘मेट्रो’तून प्रवासही केला. प्रवासात ‘मेट्रो’चे कर्मचारी-कामगारांसह विविध क्षेत्रांतील नागरिकांशी संवादही साधला. मेमध्ये होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

व्हाइटफील्ड (कादुगोडी) मेट्रो स्थानकावर आल्यानंतर मोदींनी प्रथम तिकीट खरेदी केले. त्यानंतर या उद्घाटनानिमित्त आयोजित प्रदर्शन पाहिले. त्यानंतर पंतप्रधानांनी उद्घाटन सोहळय़ाच्या नामफलकाचे अनावरण केले. नंतर ते ‘मेट्रो’त बसण्यासाठी फलाटाकडे निघाले. या वेळी त्यांच्यासोबत कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत व मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आदी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मार्गावरील प्रवासाचा वेळ ४० टक्क्यांनी कमी होईल व रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. ‘बंगळूरु मेट्रो’च्या नवीन टप्प्यामुळे माहिती-तंत्रज्ञान केंद्र, निर्यात प्रोत्साहन औद्योगिक क्षेत्रे, व्यावसायिक संकुले, रुग्णालये आणि सुमारे ५०० कंपन्यांत काम करणाऱ्या पाच ते सहा लाख बंगळूरुवासीयांची सोय होईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 01:49 IST
Next Story
कर्नाटक विधानसभा : उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसकडून जाहीर
Exit mobile version