नवी दिल्ली :‘‘युक्रेन संघर्षांवर लष्करी मार्गाने कोणताही तोडगा निघू शकणार नाही. या संघर्षांमुळे युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्प धोक्यात आले आहेत. याचे भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात,’’ अशी चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केली. युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून केलेल्या चर्चेत त्यांनी या संघर्षांवर संवादातून मार्ग काढण्याची गरज पुन्हा अधोरेखित केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान कार्यालयाने प्रसृत केलेल्या निवेदनानुसार, या दूरध्वनी संभाषणात मोदी व झेलेन्स्की यांनी युक्रेनमधील संघर्षांवर चर्चा केली. हे युद्ध व तणाव लवकरात लवकर संपवण्याची गरज आहे. त्यासाठी संवाद व मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याची आवश्यकता असल्याचे मोदींनी या वेळी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi telephonic conversation with president zelenskyy zws
First published on: 05-10-2022 at 04:31 IST