पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) सध्या जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दौऱ्यावर आहेत. जर्मनीमधील आयोजित जी-७ शिखर परिषदेत (G-7 Summit) सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जर्मनीचे चान्सलर (German Chancellor) ओलाफ स्कोल्स यांच्यासह अनेक पदाधिकारी विमानतळावर उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशांतील काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक

जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता आणि लोकशाही या विषयांवर आपले विचार मांडण्याची शक्यता आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या इतर लोकशाही देशांनाही या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी देशांतील काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.

शिखर परिषदेनंतर मोदी युएई दौऱ्यावर
शिखर परिषदेनंतर मोदी युएईला भेट देणार आहेत. युएईचे माजी राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या निधनाबाबत मोदी शोक व्यक्त करतील. तसेच युएईचे नवे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे मोदी अभिनंदनही करतील. २८ जून रोजी मोदींचा अरब दौरा संपणार असून ते भारतात परत येणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi will visit germany and uae dpj