राजीव गांधींच्या मारेकऱयांबद्दलच्या निर्णयावरील राहुल गांधींचे वक्तव्य भ्रष्टाचार या मुख्यमुद्दयाला पडद्याआड करण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठीच राहुल गांधी ‘ड्रामा’ करत असल्याचे आम आदमी पक्षाचे नेते कुमारविश्वास यांनी म्हटले आहे.
जयललितांच्या वक्तव्यावर राहुल गांधींची कडाडून टीका
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सर्व मारेकऱयांची सुटका करण्याचा निर्णय जयललीता सरकारने जाहीर केल्यानंतर राहुल गांधींनी, देशाच्या पंतप्रधानपदावरील व्यक्तीच्या आरोपींना मोकळे सोडल्यास सामान्य जनतेने कुणाकडे बघायचे, असा उद्विग्न सवाल उपस्थित केला. यावर कुमारविश्वास म्हणतात की, गेल्या दहा वर्षांपासून देशात काँग्रेस सत्तेत आहे. सोनिया आणि राहुल गांधी सरकार चालवत आहेत मग राजीव गांधींच्या हत्येच्या बाबतीत अजूनही न्याय मिळाला नाही याला जबाबदार कोण? असा प्रतिसवाल कुमारविश्वास यांनी राहुल गांधींसमोर उपस्थित केला आहे. केवळ नाराजीची आणि न्यायमिळाला नसल्याची वक्तव्ये करुन देशातील भ्रष्टाचार, गरिबी, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा या मुख्यमुद्दांना बगल देत जनतेची दिशाभूल करण्याचा ड्रामा राहुल गांधी करत आहेत. असेही कुमारविश्वास म्हणाले.
फाशी आणि फास
सोनिया आणि राहुल यांनी राजीव गांधींच्या स्वप्नांची हत्या केली आहे आणि याचे उदाहरण म्हणजे रायबरेली, अमेठी या त्यांच्या मतदारसंघांमधील त्यांचे दुर्लक्ष. येथील राजीव गांधींच्या पुतळ्यांची वाईट अवस्था राहुल गांधींना कशी दिसत नाही असेही कुमारविश्वास म्हणाले.