Rajsthan Rape Case : कोलकालाता येथील रुग्णालयात झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातून देश सावरत नाही तोवर एका लहान मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे मंदिराबाहेर झोपलेल्या या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. राजस्थानच्या जोधपूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एबीपी न्यूजने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुळचे मध्य प्रदेशचं असलेलं हे कुटुंब राजस्थान येथील एका झोपडपट्टीत राहतात. हे कुटुंब मध्यरात्री मंदिराबाहेरच झोपी गेलं. त्यांच्याबरोबर असलेली तीन वर्षांची चिमुकलीही तिथेच झोपली. पण मध्यरात्री तिचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. गुंडाळलेल्या फडक्यात ती पहाटे साडेसहाच्या दरम्यान साडपली. ती सापडली तेव्हा तिच्या ओठांवर आणि पाठीवर जखमेच्या खुणा होत्या.

सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल कुमार यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे २ च्या सुमारास एक व्यक्ती मुलीला घेऊन जात असल्याचे चित्र आहे, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली. कुमार म्हणाले, “आम्ही सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासत आहोत आणि आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

हेही वाचा >> Sanjoy Roy : संजय रॉय माझ्या मुलीला रोज मारहाण करायचा, तिचा गर्भपात..; कोलकाता प्रकरणातल्या आरोपीबाबत सासूने काय सांगितलं?

आई मानसिक आरोग्याने त्रस्त

पोलिस उपायुक्त (पश्चिम) राजेश कुमार यादव यांनी खुलासा केला की, मुलीचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशचे असून, जोधपूरमधील झोपडपट्टीत राहत होते. मुलाचे वडील रॅगपिकर म्हणून काम करतात आणि तिची आई मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहे. मुलीला पाच वर्षांचा भाऊही आहे, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.

दरम्यान, कोलकाता बलात्कार प्रकरणी देशभर संताप व्यक्त केला जात आहे. कोलकाता येथील आर. जी कर मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार ( Kolkata Doctor Rape ) करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जातो आहे. या घटनेवरुन देशभरातले डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं शनिवारी पाहण्यास मिळालं. आता या प्रकरणात संजय रॉयच्या ( Sanjoy Roy ) सासूची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी संजय रॉय विकृत माणूस आहे असं म्हटलं आहे ANI ला दिलेल्या मुलाखतीत संजय रॉय ( Sanjoy Roy ) त्यांच्या मुलीवर कसे अन्याय करायचा ते पण सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajsthan rape case 3 year old girl abducted and raped sgk