अयोध्येतील राम मंदिरात बहुप्रतिक्षित असा विलोभनीय सोहळा साजरा झाला. भगवान रामाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. भगवान रामाची एक झलक पाहण्याकरता रामभक्त आतूर झाले होते. श्रीरामाची मूर्ती कशी असेल, या मूर्तीची वैशिष्ट्य काय असतील, असं असंख्य प्रश्न रामभक्तांच्या मनात होते. अखेर भगवान रामाची मूर्ती आता अवघ्या देशासमोर आली आहे. कृष्णवर्णीय असलेली ही मूर्ती लोभस आणि सुंदर आहे. त्यामुळे या मूर्तीला साजेसं असं नावही ठेवण्यात आलं आहे. अयोध्येतील एका पूजाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. पीटीआयच्या हवाल्याने इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“२२ जानेवारीला अभिषेक करण्यात आलेल्या रामलल्लाच्या मूर्तीला ‘बालक राम’ असे नाव देण्यात आले आहे . प्रभू रामाच्या मूर्तीला ‘बालक राम’ असे नाव देण्याचे कारण म्हणजे ही मूर्ती बालरुपातील आहे. पाच वर्षीय बालकाचे रुप या मूर्तीत आहे, अशी माहिती येथील पूजारी अरुण दीक्षित यांनी दिली. “जेव्हा मी पहिल्यांदा मूर्ती पाहिली, तेव्हा मी रोमांचित झालो आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तेव्हा मी अनुभवलेल्या भावना शब्दांत सांगू शकत नाही”, असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा >> “अयोध्येतील राम मंदिरातल्या मूर्तीला नेसवण्यात आलेल्या वस्त्राला देण्यात आलं ‘हे’ नाव, डिझायनर मनिष त्रिपाठींची माहिती

अरुण दीक्षित हे वाराणसीचे असून त्यांनी आतापर्यंत जवळपास ५० ते ६० अभिषेक केले आहेत. रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाचा अभिषेक होता, असंही ते म्हणाले. त्यांनी १८ जानेवारी रोजी मूर्तीचे पहिले दर्शन घेतले. ५१ इंच आकारमानाची ही मूर्ती म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे.

हेही वाचा >> प्राणप्रतिष्ठा दिनी मुस्लीम महिलेची प्रसूती, बाळाच्या नावातून दिला हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश; ‘या’ हटके नावाची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यांनी ८४ सेकंदांच्या अभिषेक मुहूर्तावर अभिषेक केला. सेलिब्रिटी, खेळाडू, व्यापारी आणि उद्योगपतींसह सात हजारांहून हून अधिक पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram lalla idol in ayodhya temple to be called by this name sgk
First published on: 23-01-2024 at 21:33 IST