कर्नाटकातील हिजाब प्रकरण
बंगळूरु : निश्चित गणवेश नसलेल्या शिक्षण संस्थांमध्येही हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना रोखण्यासाठी न्यायालयाच्या हंगामी आदेशाचा गैरवापर करण्यात येत असल्याचे प्रतिज्ञापत्र मंगळवारी याचिकाकर्त्यांच्या वतीने कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल़े न्यायालयाने ते फेटाळल़े.
हिजाबप्रकरणी मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस़ दीक्षित, न्यायमूर्ती ज़े एम़ काझी यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी झाली़ शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक पेहराव टाळण्याचे निर्देश न्यायालयाने १० फेब्रुवारीला दिले होत़े या हंगामी आदेशाचा गैरवापर करण्यात येत असल्याचे प्रतिज्ञापत्र याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅडम् मोहम्मद ताहीर यांनी दाखल केले होत़े मात्र, हे प्रतिज्ञापत्र वकिलांनी स्वत: दाखल केले असून, ते याचिकाकर्त्यांच्या शपथेवर दाखल करायला हवे, असे नमूद करत न्यायालयाने ते फेटाळून लावल़े