लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात निवडणूक आयोगाकडून भरारी पथके स्थापन केलेली आहेत. अवैध पद्धतीने रोखीची वाहतूक रोखणे आणि निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालणे, यासाठी आयोगाकडून प्रयत्न केले जात असतात. आंध्रप्रदेशमध्ये निवडणूक काळात रोकड जप्त करण्याचे काही प्रसंग घडले आहेत. नुकताच एक प्रकार निदर्शनास आला ज्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. यावेळी भरारी पथकाच्या नजरेत न येताच सात कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. चुकून झालेल्या अपघातामुळे ही अवैध रोकड जप्त करण्यात पोलिसांनी यश आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमके प्रकरण काय?

आंध्रप्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात एका अपघातामुळे कोट्यवधीची रोकड हस्तगत करण्यात आली. नल्लाजारला मंडळातील अनंतपल्ली येथे खासगी वाहन आणि लॉरीची धडक झाली. या धडकेत खासगी वाहन उलटले. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या निदर्शनास आले की, खासगी वाहनात पुठ्ठ्याचे सात खोके होते. ज्यामध्ये रोकड दिसत होती. ही रोकड वाहन चालक गोणीत भरल्याचे दिसल्यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

हे खासगी वाहन विजयवाडा येथून विशाखापट्टणम येथे जात होते. खासगी वाहनाच्या चालकाला अपघातानंतर किरकोळ जखम झाली असून गोपालपूरम येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी रोकड ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या रोखीचा उगम वैध आहे का? याचा तपास केला जात आहे.

दोन दिवसांपूर्वीच आंध्रच्या एनटीआर जिल्ह्यात पोलिसांनी उभारलेल्या चौकीवर एका ट्रकमध्ये ८ कोटींची जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी दोन लोकांना अटक करण्यात आले आहे. या ट्रकमध्ये एक गूप्त पाईपमध्ये रोकड लपविण्यात आली होती. १३ मे रोजी राज्यात मतदानाची सुरूवात झाली आहे. तेव्हापासून ही दुसरी मोठी कारवाई आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rs seven crore cash seized after vehicle meets with accident in andhra pradesh kvg