लोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Loksabha Election Results 2024) भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी एकदा घेणे आवश्यक आहे. लोकसभेचे सदस्य निवडण्यासाठी भारतात एप्रिल आणि मे २०२४ दरम्यान पुढील सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित आहे.
लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. मागील सार्वत्रिक निवडणूका एप्रिल मे २०१९ पार पडल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांचा कालावधी हा जरी पाच वर्षांचा असला, तरी देशातील बहुसंख्य नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीत किमान दोनदा निवडणुकांना सामोरे जावे लागते. गेल्या दोन महिन्यांपासून देशात सर्व निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. यसाठी माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबरोबरच राज्यांमधील विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाणार असल्याची चर्चा आहे. विधी आयोग लवकरच वन नेशन, वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणूक संदर्भात आपला अहवाल सादर करणार आहे. अहवालाच्या माध्यामातून विधी आयोग एकत्र निवडणुका घेण्याच्या मुद्याला समर्थन देण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगानं मात्र यासाठी पूर्ण तयारी नसल्याची भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ संबधीत सर्व घडामोडी येथे जाणून घेऊ शकता.
महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल २०२४