Salwan Momika, Iraqi man who carried out several Quran burnings in Sweden dead : स्वीडनमध्ये अनेकदा कुराण जाळणाऱ्या इराणी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. स्टॉकहोम न्यायालयच्या हवाल्याने असोशियटेड प्रेस या वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. स्वीडन येथील माध्यमांच्या हवाल्याने एपीने सांगितले की, स्टॉकहोम जवळ त्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३८ वर्षीय सलवान मोमिका (Salwan Momika) याने स्वीडनमध्ये इस्लाम धर्मातील पवित्र ग्रंथ जाळला होता, तसेच अनेकदा त्याची विटंबनाही केली होती. दरम्यान सलवान मोमिका याची सध्या स्वीडिश यंत्रणांकडून चौकशी केली जात होती, त्याच्यावर विशिष्ट समुदायाविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप होता. न्यायालयात गुरूवारी त्याच्या विरोधात निकाल देण्यात येणार होता, ज्यामध्ये मोमिका हा प्रतिवादी होता. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे सांगत न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली.

नेमकं काय झालं?

बुधवारी रात्री स्टॉकहोम जवळ सोदरताल्जे (Sodertalje) येथे गोळीबाराची घटना घडली होती. या घटनास्थळी एका व्यक्तीचा गोळ्या लागलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. नंतर मृत व्यक्तीची ओळख सालवान मोमिका अशी करण्यात आली, अशी माहिती स्वीडिश वृत्तवाहिनी एसव्हीटीने दिली.

रिपोर्टनुसार मोमिका हा इराकहून २०१८ मध्ये स्वीडन येथे आला होता. त्याला २०२१ मध्ये तीन वर्षांचे रहिवासी परमीट देण्यात आले होते.

कुराण जाळल्याच्या घटनेनंतर मोमिका याने युक्तीवाद केला होता की त्याचे आंदेलन हे इस्लाम धर्माविरोधात होते, मुस्लीम लोकांविरोधत नाही. तसेच आपल्याला कुराणमध्ये देण्यात आलेल्या संदेशांपासून स्वीडनच्या लोकांचे संरक्षण करायचे होते असा दावाही मोमिका याने केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salwan momika iraqi man who carried out several quran burnings shot dead in sweden marathi news rak