ज्येष्ठ वकील आर वेंकटरामनी यांची तीन वर्षांसाठी भारताचे नवे अ‍ॅटर्नी जनरल (महान्यायवादी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मोठी बातमी! देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती

कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या कार्यालयाने ट्वीट करत याबाबत अधिक माहिती दिली आहे. आर वेंकटरामनी यांना अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्त करताना राष्ट्रतींना आनंद होत आहे. १ ऑक्टोबर २०२२ पासून ते आपला पदभार स्वीकारतील, असे या ट्वीटमध्ये रिजिजू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे. विद्यमान अ‍ॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल हे ९१ वर्षांचे असून त्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे.

हेही वाचा >>> केंद्र सरकारच्या कारवाईनंतर PFI ने उचललं मोठं पाऊल, घेतला संघटना बरखास्तीचा निर्णय

याआधी माझे वाढते वय पाहता आगामी काळात ही जबाबदारी पार पडणे मला शक्य होणार नाही, असे वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारला कळवले होते. त्यानंतर केंद्र सरकारने आर वेंकटरामनी यांची अ‍ॅटर्नी जनरलपदी नियुक्ती केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior advocate r venkataramani has been appointed as the new attorney general for india prd
First published on: 28-09-2022 at 22:34 IST