दिल्लीत प्रियकराने प्रेयसीचा खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची घटना समोर आल्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. दरम्यान पीडित तरुणी श्रद्धा वालकरच्या वडिलांनी आरोपी आफताबचा कबुली जबाब ऐकणं आपल्यासाठी फार अवघड होतं असा खुलासा एनडीटीव्हीशी बोलताना केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“त्याने माझ्यासमोरच कबुली जबाब दिला. पोलिसांना त्याला ‘तू यांना ओळखतो का?’ अशी विचारणा केली. यावर त्याने हे श्रद्धाचे वडील आहेत असं सांगितलं. यानंतर त्याने श्रद्धा आता जिवंत नसल्याची माहिती देत घटनाक्रम सांगितला. यानंतर मी तिथेच खाली कोसळलो. मला ते ऐकवलं जात नव्हतं. यानंतर पोलिसांनी त्याला बाजूला नेलं. मी ऐकण्याच्या स्थितीत नव्हतो,” असं त्यांनी सांगितलं आहे.

पोलिसांनीही जेव्हा श्रद्धाचं काय झालं आहे सांगितलं, तेव्हाही आपला विश्वास बसत नव्हता असं ते म्हणाले आहेत. “मी स्तब्ध झालो होतो. घटनेचा सगळा तपशील ऐकणं माझ्यासाठी फार कठीण होतं. त्यांच्या अपार्टमेंटमध्ये जाण्याचा अनुभवही भयानक होता,” असं त्यांनी सांगितलं आहे.

Shraddha Murder Case: तिचा गळा दाबणं सोपं होतं, पण…; मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबचा पोलिसांकडे धक्कादायक खुलासा

“तुम्ही अडीच वर्षांपासून एकत्र राहत असताना तू मला आधीच का सांगितलं नाहीस. मला तिच्या मित्रांकडून ती बेपत्ता असल्याचं कळलं. यावर त्याने आम्ही नात्यात नसताना तुम्हाला कशाला कळवायचं असं उत्तर दिलं,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

“तेव्हाच मला काहीतरी संशयास्पद असल्याची जाणीव झाली. मी पोलिसांना तो खोटं बोलत असल्याचं सांगितलं. जर त्यांचं प्रेम होतं तर मग तिची काळजी घेणं ही त्याचीच जबाबदारी होती. तो ही जबाबदारी झटकू शकत नाही,” असं ते म्हणाले.

PHOTOS: मुंडकं कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आफताब रोज श्रद्धाचा चेहरा पाहायचा, धक्कादायक खुलासे ऐकून पोलीसही चक्रावले

श्रद्धा आणि आफताबच्या प्रेमप्रकरणामुळेच आपण त्यांच्याशी बोलत नव्हतो असं त्यांनी सांगितलं आहे. “२०२० मध्ये माझी त्याच्याशी ओळख झाली. मी त्यावेळी श्रद्धाला त्याच्याशी लग्न करु नको असं सांगितलं होतं. तू आपल्या समाजातील मुलाशी लग्न करावंसं अशी माझी इच्छा असल्याचं मी तिला म्हटलं होतं,” असं त्यांनी सांगितलं. आफताबला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नेमकी घटना काय?

वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकरचा तिचाच प्रियकर आफताब पूनावाला याने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केले. आरोपी प्रियकराने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharaddha walkar father vikas palkar says i was collapsed after hearing details from accused aftab poonawala sgy