Sonam Raghuvanshi Case latest Update : इंदोर येथील उद्योजक राजा रघुवंशी यांच्या मेघालय येथे झालेल्या हत्येच्या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येताना दिसत आहे. २ जून रोजी राजा याचा मृतदेह मेघालय येथील एका दरीत आढळून आला होता. यानंतर राजा रघुवंशी याची पत्नी सोनम आणि तिचा कथित बॉयफ्रेंड, राज कुशवाह हे या प्रकरणात संशयीत आहेत आणि या दोघांनीच इतक काही जणांच्या मदतीने ही हत्या घडवून आणल्याचा संशय आहे.

डिजीटल फूटप्रिंट्स आणि रक्ताने माखलेले कपडे, सीसीटीव्ही फुटेज आणि काही साक्षीदार यांच्या तापसणीतून हे एक सुपारी देऊन हत्या करवून घेतल्याचे प्रकरण असल्याचे तपासकर्त्यांचे म्हणणे आहे.

आत्तापर्यंत सापडलेले ठोस पुरावे काय आहेत?

आरोपींपैकी एक असलेल्या आकाश याचा रक्ताने माखलेला शर्ट आढळून आसा आहे, ज्याच्या फॉरेन्सिक चाचणीतून ते रक्त राजा रघुवंशी याचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. रक्ताचा काही अंश असलेला सोनमचा रेनकोटची देखील सध्या फॉरेन्सिक चाचणी केली जात आहे.

याबरोबरच हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली एक कुकरी देखील ताब्यात घेण्यात आली असून त्याचा देखील तपास केला जात आहे.

दुसरा एक आरोपी आनंद याला अटक केली जात असताना त्याने रक्ताचे डाग असलेले कपडे घातलेले होते.

अनेक ठिकाणी आरोपींच्या बोटांचे ठसे सापडले आहेत, यामध्ये राजाच्या काही वस्तू आणि हत्या करण्यासाठी वापरलेले हत्यार यांचा समावेश आहे.

इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस जसे की मोबाईल फोन आणि आरोपींनी वापरलेले इतर डिजीटल डिव्हायसेसे यांचे कॅश देखील तपासले जात आहेत.

याबरोबरच ४२ ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे, जेणेकरून सोनम, राजा आणि आरोपी यांची मेघालय आणि त्याव्यतिरिक्त ठिकाणी केलेला प्रवास तपासून पाहाता येईल.

आरोपींच्या बुकिंग्जबद्दल माहिती मिळवण्यासाठी हॉटेल मालकांचे जबाब घेतले जात आहेत. या जोडप्याने शिलाँगमधील स्कूटर भाड्याने देणार्‍या दुकानदाराकडून स्वाक्षरी केलेल्या भाड्याच्या नोंदी मिळवल्या आहेत.

हत्येत वापरलेली कुकरी विकणाऱ्या दुकानदाराची साक्ष, तसेच आरोपींनी लॉजमध्ये देलेले आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रांच्या झेरॉक्स, सर्व संशयितांच्या प्रवासाच्या वेळेशी जुळणारी संबंधित रेल्वे आणि विमान तिकिटे.

कॉल डिटेल रेकॉर्डवरून सोनम, तिचा कथित जोडीदार राज कुशवाह आणि तिन्ही मारेकऱ्यांमध्ये झालेला संवाद देखील उघड झाला आहे.

२३ मे रोजी मोबाईल फोन लोकेशन डेटा हे सर्व हत्या झाली त्या दिवशी म्हणजे २३ मे रोजी त्याच ठिकाणाच्या जवळ दाखवत आहे.

प्राथमिक पोलिस चौकशीत तिन्ही भाडोत्री मारेकऱ्यांनी तोंडी जबाब दिले आहेत. तसेच या प्रकरणात असंख्य डिजिटल पुरावे आढळले आहेत, ज्यापैकी काही विश्लेषणासाठी केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आहेत.

अजून कोणत्या गोष्टींचा उलगडा होणे बाकी?

ही सर्व माहिती उगड झाली असली तरी तपास कर्त्यांना अद्याप सोनमचा फोन सापडेला नाही, ज्यामध्ये तिने केलेली चॅट, फोटोग्राफ किंवा कॉल लॉग असू शकतात. तसेच इतर आरोपींचे फोन देखील गायब आहेत, तसेच हत्या घडली तेव्हा इतर काही आरोपींनी घातलेले कपडे देखील गायब आहेत.

अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे की त्यांनी अजून पैसे दिल्याच्या अजून सुगावा लागलेला नाही. विशेषतः हत्येसाठी कबुल करण्यात आलेली २० लाख रुपयांची रक्कम. तसेच आरोपींनी हत्येनंतर वापरलेले रस्ते आणि लपून राहण्यासाठी वापरलेल्या जागा याबद्दल अद्याप माहिती समोर येणे बाकी आहे.

या प्रकरणाचा उलगडा करणारे पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक (एसपी) विवेक सयीम यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, पीडिताची पत्नी आणि तिचा कथित साथीदार राज कुशवाहा यांच्या या प्रकरणातील सहभाग दाखवून देणारे ठोस पुरावे आहेत.

घटनाक्रम कसा घडला?

विशेष तपास पथक (एसआयटी)ने या प्रकरणातील घटनाक्रम नेमका कसा घडला याबद्दल माहिती समोर आणली आहे.

१) तीन जण – आकाश, आनंद आणि विकास हे इंदोरहून शिलॉंग येथे गेले. उघड होऊ नये यासाठी त्यांनी वेगवेगळी वाहने वापरली.

२) २३ मे रोजी सोनम आणि राजा हे चेरापुंजी येथे ट्रेकसाठी बाहेर पडले, त्यांच्याबरोबर तीन आरोपी देखील होते.

३) त्यांनी डबल-डेकर लिव्हिंग रूट ब्रीजकडे जाण्यासाठी पर्यटक वापरतात तो रस्ता सोडला आणि कमी माहिती असलेला आणि ओबडधोबड वाट निवडली.

४) स्थानिक गाईड अल्बर्ट पडे (Albert Pde) याने त्यांना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पाहिले, ते सर्व जण हिंदीत बोलत होते आणि त्यांनी आम्हाला गाईड नको असे त्याला सांगितले.

५) निर्जन स्थळी पोहचल्यावर सोनम थोडी मागे राहिली आणि त्याला ठार करा असे ओरडली, यानंतर विकी ठाकरू याने राजा याच्यावर पहिला वार केला.

६) त्यानंतर इतर दोन आरोपी सहभागी झाले आणि त्यांनी राजा याच्या डोक्यावर आणि अंगवर धारदार शस्त्राने वार केले.

७) त्यानंतर मृतदेह ढकलून नेऊन तो दरीत ढकलण्यात आला, मिळालेल्या माहितीनुसार सोनम हे सर्व करवून घेत होती.

हत्येनंतर काय?

हत्या केल्यानंतर एक तासाने सोनमने Mawkadok येथून शिलाँगसाठी टॅक्सी बूक केली , त्यानंतर रोडने प्रवास करत ती गुवाहाटी येथी आली. येथून तिने कथितरित्या इंदोरला ट्रेनने प्रवास केला, पण याचा अद्याप तपास केला जात आहे. तीन आरोपी मेघालय येथून गुवाहाटी येथे आले आणि तेथून त्यांनी वेगवेगळ्या ट्रेन घेतल्या आणि ते मध्यप्रदेशात पोहचले.

महत्त्वाच्या घटना


मे ११ – राजा आणि सोनम यांचे लग्न झाले.
मे २१ – हे जोडपे शिलाँग येथे दाखल झाले आणि बालाजी गेस्ट हाऊसमध्ये पोहचले.
मे २२ – त्यांनी एक स्कूटी भाड्याने घेतली आणि ते सोहरा (चेरापुंजी) येथे गेले.
मे २३ – जोडप्यांने ट्रेकला सुरूवात केली, ज्यादरम्यान कथित राजा याची हत्या करण्यात आली.
मे २४ – सोहरारिम येथे बेवारस स्कूटी आढळून आली.
जून २ – राजाचा मृतदेह आढळून आला.
जून ७ – पोलीसांनी तीन आरोपींना मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातून अटक केली.
जून ८ – सोनम यूपीतील गाझीपूर येथे पोलिसांना शरण आली.