SORRY BUBU : उत्तर प्रदेशातील नोएडा आणि मेरठमधील विविध ठिकाणी ‘SORRY BUBU’ लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. यासंदर्भातील काही व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहेत. ‘SORRY BUBU’ लिहिलेले पोस्टर्स हे पोस्टर्स शहरातील अनेक भागात विशेषत: नोएडाच्या सेक्टर ३७ मधील बोटॅनिकल गार्डनर, मेट्रो स्टेशन आणि फूट ओव्हर ब्रिज या परिसरात लावण्यात आलेले आढळून आलेले आहेत. हे पोस्टर्स लावल्याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोएडा आणि मेरठ शहरात विविध ठिकाणी ‘SORRY BUBU’ लिहिलेले पोस्टर्सच्या संदर्भात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत सोशल मीडियावर याची वेगवेगळी चर्चा रंगली आहे. तसेच सोशल मीडियावर व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सेक्टर ३९ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या पोस्टर्सची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांकडून आता या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. हे पोस्टर्स नेमकी कोणी लावले? याचा माग सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस घेत आहेत.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

अशा प्रकारचे पोस्टर्स कोणी लावले? याचा तपास पोलीस करत आहेत. अशा प्रकारचे पोस्टर्स लावणाऱ्यांना पोलीस लवकरच ताब्यात घेतील असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे परवानगीशिवाय पोस्टर्स लावणे बेकायदेशीर असल्याचं नोएडा पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, असं असतानाही ज्यांनी कोणी हे पोस्टर्स लावले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र, अद्याप पोलिसांना या पोस्टर्सबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. मात्र, काही जणांकडून ‘SORRY BUBU’ लिहिलेले पोस्टर्सबाबत वेगवेगळा अंदाज लावला जात आहे. हा मार्केटिंग स्टंट आहे का? असा सवालही काहींनी उपस्थित केला आहे.

तसेच एखाद्या प्रियकराने असे पोस्टर्स लावले तर नाही ना? असा सवालही काहींनी उपस्थित केला आहे. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि तेही दोन शहरात अशा प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आल्यामुळे ही एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे असे वाटत नाही, तर मोठ्या प्रमाणावर केलेली ही योजना किंवा मार्केटिंग स्टंट अशू शकतो, असांही अंदाज काहीजण लावत आहेत. तसेच काही व्यक्तींनी हे पोस्टर्स चित्रपट किंवा एखाद्या वेब सीरिज किंवा ब्रँडच्या जाहिरातीचं एक धोरण असू शकते, असंही बोललं जात आहे. त्यामुळे आता ‘SORRY BUBU’ लिहिलेले पोस्टर्स लावण्यामागे नेमकं कारण काय? आणि हे कोणी लावले? याची माहिती पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sorry bubu news sorry bubu posters are widely discussed in noida and meerut police have started investigation gkt