Premium

हमासने इस्रायलवर ५ हजार रॉकेट्स डागले, ४० जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदी म्हणाले, “या कठीण काळात…”

इस्रायलमधील भारतीय दुतावासाने आपल्या नागरिकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत

modi on israel
पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याबाबत बोलले आहे. ( फोटो सौजन्य – अल जझीरा, पंतप्रधान अधिकृत संकेसस्थळ )

हमास आणि इस्रायल यांच्यात पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. गाझा पट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी ( ७ ऑक्टोबर ) सकाळी इस्रायलवर ५ हजार रॉकेट्स डागले. प्रत्युत्तरात इस्रायल लष्करानेही गाझा पट्टीत हवाई हल्ले केले आहेत. इस्राइलवरील हल्ल्यामुळे जगाला एकच धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राइलच्या पाठीशी उभे असल्याचं सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर म्हणाले, “इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्तानं मला धक्का बसला आहे. आमची प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर आहे. या कठीण काळात आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत.”

हेही वाचा : रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियाची उडी? किम जोंग-उन यांच्याकडून व्लादिमीर पुतिन यांना युद्धसामग्रीचा पुरवठा

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “ही ना कोणती मोहीम आहे, ना हा कुठला सामान्य गोळीबार आहे. हे युद्ध आहे. आपण युद्धात आहोत. हमासच्या दहशतवाद्यांना अद्दल घडवली जाईल,” अशा शब्दांत बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला ठणकावलं आहे.

इस्रायलमधील भारतीयांना सूचना

इस्रायलमधील भारतीय दुतावासाने आपल्या नागरिकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. “इस्रायलमधील परिस्थिती पाहता सगळ्या भारतीयांनी सतर्क राहावं. स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सुरक्षा नियमावलीचं पाल करावं. विनाकारण बाहेर फिरणे टाळावं. अधिक मदतीसाठी भारतीय दुतावासाशी संपर्क साधावा,” असं भारतीय दुतावासानं पत्रक काढत म्हटलं आहे.

हेही वाचा : हमासच्या क्रौर्याची परिसीमा; इस्रायली तरुणीच्या अर्धनग्न मृतदेहाची काढली धिंड; व्हिडीओमुळे दहशतवाद्यांचे अत्याचार आले जगासमोर!

दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. एका पॅलेस्टाइनचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stand in solidarity with israel at this difficult hour pm modi after hamas assault ssa

First published on: 07-10-2023 at 19:03 IST
Next Story
हमासच्या क्रौर्याची परिसीमा; इस्रायली तरुणीच्या अर्धनग्न मृतदेहाची काढली धिंड; व्हिडीओमुळे दहशतवाद्यांचे अत्याचार आले जगासमोर!