दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री किशोरी बलाल यांचं निधन झालं. गेल्या कित्येक दिवसापासून त्या आजारी होत्या. चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. किशोरी बलाल यांनी दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं होतं.  त्यांनी बॉलिवूड चित्रपट ‘स्वदेस’मध्ये कावेरी अम्मा ही भूमिका साकारली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“किशोरी बलाल यांच्या निधनामुळे प्रचंड दु:ख होत आहे. तुमच्या स्वभावातला दयाळूपणा, सहृदयपणा आणि प्रेम यामुळे कायम तुम्ही आमच्या लक्षात रहालं. तसंच स्वदेसमधील तुम्ही साकारालेली कावेरी अम्मा कायम आठवणीत राहण्यासारखी आहे. खरंच तुमची फार आठवण येईल”, अशी पोस्ट आशुतोष गोवारीकरने शेअर केली आहे. सोबत किशोरी बलाल यांचा फोटोही शेअर केला आहे.

किशोरी बलाल यांनी १९६० मध्ये करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणेच काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं. ‘स्वदेस’, ‘अय्या’ आणि ‘लफंगे परिंदे’ या चित्रपटातही काम केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swades actress kishori ballal passed away ssj