अफगाणिस्तानमधील तालिबानी या दहशतवादी संघटनेचा नेता मुल्लाह अख्तर मन्सूर हा अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात ठार झाला आहे. तालिबान दहशतवाद्यांना लक्ष्य करूनच अमेरिकन लष्कराने ही मोहीम सुरू केली होती. त्यात त्यांना यश आले आहे.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर अमेरिकेकडून शनिवारी पहाटे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात मुल्लाह मन्सूर ठार झाला. मन्सूर याच्यासोबत अन्य एक जणही मारला गेला आहे. मुल्लाह मन्सूर हा अफगाणिस्तानमध्ये हल्ले घडवून आणण्यात सक्रीय होता.
अमेरिकेच्या हल्ल्यात गेल्या वर्षी आफगाण तालिबानचा नेता मुल्ला मोहम्मद ओमर ठार झाला होता. ओमरनंतर तालिबानची सुत्रे मुल्ला अख्तर मन्सूर सांभाळत होता. मन्सूनने ओमरचा सहाय्यक म्हणूनही काम केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2016 रोजी प्रकाशित
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात तालिबानचा म्होरक्या मुल्ला मन्सूर ठार
ओमरनंतर तालिबानची सुत्रे मुल्ला अख्तर मन्सूर सांभाळत होता.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 22-05-2016 at 11:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taliban leader mullah mansour likely killed in us airstrike