School Bus Accident तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यात सकाळच्या सुमारास एक भयंकर अपघात झाला आहे. शाळेची बस रेल्वे रुळ ओलांडत होती त्याचवेळी समोर आलेल्या ट्रेनने या बसला धडक दिली. या घटनेत अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. जे विद्यार्थी जखमी झाले आहेत त्यांना कडलूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शाळेची बस रेल्वे रुळ ओलांडत होती. त्यावेळी चालकाने समोरुन येणाऱ्या ट्रेनकडे दुर्लक्ष केलं आणि रुळ ओलांडला जाईल असं त्याला वाटलं. पण प्रत्यक्षदर्शींनी दिलेलया माहितीनुसार धडक एवढी जबरदस्त होती की बसचं या अपघातात प्रचंड नुकसान झालं. शिवाय मुलंही फेकली गेली. या घटनेत अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे.

नेमकी काय घडली घटना?

आज सकाळी ७.४५ च्या सुमारास कडलूरमधील शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन चालली होती. रेल्वे क्रॉसिंगचं गेट सुरु होतं. त्यामुळे बस ट्रेन यायच्या आत पुढे जाईल. पण त्याचा अंदाज सपशेल चुकला, बस रुळांवर आली तेव्हाच समोरुन भरधाव वेगाने ट्रेन आली. या ट्रेनने बसला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसचा अक्षरशः चुराडा झाला. धडक दिल्याने बस ५० मीटरपर्यंत फरपटत गेली. विद्यार्थी खाली पडले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले. मदत आणि बचावकार्यही सुरु करण्यात आलं. जे विद्यार्थी जखमी झाले आहेत त्यांच्यावर कडलूरच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

मदत आणि बचावकार्य तातडीने सुरु

प्रत्यक्षदर्शींपैकी एकाने या भीषण अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर या ठिकाणी पोलीस दाखल झाले. शिवाय या ठिकाणी मदत आणि बचाव करणारी पथकंही पोहचली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरु केलं आहे. या घटनेत अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते आहे. दरम्यान किती जणांचा मृत्यू झाला ती संख्या अधिकृतरित्या समजू शकलेली नाही.