संसदेत शुक्रवारी बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात काहीसे उत्साहाचे वातावरण होते. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी संपूर्ण बजेट सादर केल्यानंतर हे उत्साहाचे वातावरण मावळले. या बजेटवर शेअर बाजाराने नाराजी व्यक्त केल्याने सेन्सेक्समध्ये तब्बल ३०० हून अधिक अंकांनी घसरण पहायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बजेटच्या दिवशी सकाळी सेन्सेक्स ४०,००० अंकांच्या पार गेला होता. मात्र, त्यानंतर यामध्ये घसरण पहायला मिळाली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये सुमारे ३५३.३५ अंकांनी म्हणजेच ०.८९ टक्क्यांनी घसरण झाली. त्यानंतर आता सेन्सेक्स ३९५५४.७१ अंकांवर पोहोचला आहे. तर निफ्टीमध्येही १२३.२५ अंकांची अर्थात १.०३ टक्क्यांची घसरण झाली आणि तो ११.८२३.५० वर पोहोचला.

आठवड्याच्या आजच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी शेअर बाजार हिरव्या दिव्याने सुरु झाला. सकाळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १०६.९९ अंकांनी म्हणजेच ०.२७ टक्क्यांनी उसळी घेत ४०,०१५.०५ अंकांवर जाऊन पोहोचला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक निफ्टी ३२.१० अंकांनी अर्थात ०.२७ टक्क्यांनी सुधारत ११,९७८.८५ अंकांवर पोहोचला होता.

बजेटमध्ये बँका आणि एनबीएफसीबाबत निर्माण झालेली अडचण दूर करण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले आहेत. तसेच सेबीचे किमान पब्लिक शेअर होल्डिंग २५ टक्क्यांवरुन ३५ टक्के करण्यास सांगण्यात आले आहे. सरकारी बँकांना ७० हजार कोटी रुपये देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. मात्र, तरीही अनेक आघाड्यांवर अपेक्षाभंग झाल्याने शेअर बाजारात नाराजी पहायला मिळाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The stock market upset after budget big fall in the sensex aau