टर्कीमध्ये पुन्हा एकदा रेसेप तय्यीप एर्दोगन (Recep Tayyip Erdogan) यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. विरोधी पक्षनेते कमाल कलचदारलू यांचा पराभव करुन एर्दोगन हे ११ व्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्यात एर्दोगन यांना बहुमत मिळालं. तर कमाल कलचदारलू यांचा पराभव झाला. समोर आलेल्या माहितीनुसार एर्दोगन यांना ५२ टक्के मतं मिळाली आहेत. तर कलचदारलू यांना ४८ टक्के मतं या राऊंडमध्ये मिळाली.
टर्कीच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक १४ मे रोजी पार पडली होती. त्यावेळी एकेपी पक्षाचे प्रमुख एर्दोगन हे जिंकता जिंकता राहिले होते. त्या राऊंडमध्ये त्यांना ४९.४ टक्के मतं मिळाली तर कलचदारलू यांना ४५ टक्के मतं मिळाली होती. दोन्ही नेत्यांना त्या राऊंडमध्ये बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे रविवारी दुसऱ्या राऊंडचं मतदान झालं. टर्कीमध्ये मतदानाची ही पद्धत आहे की जर कुणालाच बहुमत मिळालं नाही तर दोन आठवड्यात मतदानाचा दुसरा राऊंड घेतला जातो. २८ मे रोजी ही प्रक्रिया पार पडली त्यामध्ये एर्दोगन विजयी झाले आहेत.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.