केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात दोन जणांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मृत्यू निपाह विषाणूच्या संसर्गामुळे झाल्याचा संशय आरोग्य विभागाला आहे. या घटनेनंतर कोझिकोड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. याप्रकरणी राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सोमवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संबंधित निवेदनात आरोग्य विभागाने म्हटलं की, कोझिकोड येथील एका खासगी रुग्णालयात दोघांना ताप येऊन अनैसर्गिक मृत्यू झाला आहे. संबंधित दोन्ही मृत्यू निपाह विषाणूच्या संसर्गामुळे झाल्याचा संशय आहे. त्याचबरोबर मृतांपैकी एकाच्या नातेवाईकालाही अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा- आरोग्य वार्ता : मोबाइलमुळे करोनाचा अधिक वेगाने संसर्ग

२०१८ आणि २०२१ मध्ये कोझिकोड जिल्ह्यात निपाह विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दक्षिण भारतातील पहिला निपाह विषाणूचा (NiV) रुग्ण १९ मे २०१८ साली कोझिकोड येथे आढळून आला होता.

हेही वाचा- विश्लेषण: जगभरात ‘पिरोला’चा धोका वाढतोय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, निपाह विषाणूचा संसर्ग हा एक झुनोटिक आजार आहे. जो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. त्याचबरोबर दूषित अन्न किंवा थेट संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या विषाणूची लागण होते. निपाह विषाणूच्या संसर्गामुळे अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. अगदी लक्षणं नसलेल्या (सबक्लिनिकल) संसर्गापासून ते तीव्र श्वसनाचे आजार आणि प्राणघातक एन्सेफलायटीसपर्यंतचे विविध आजार होतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two unnatural deaths in kerala suspected to nipah virus rmm