राजस्थानधील उदयपूरमध्ये कन्हैयालाल नावाच्या शिंपीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला असून याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कन्हैयाय लालच्या हत्येत आरोपींनी जी दुचाकी वापरली तिचा नंबर २६११ होता. या खास क्रमांकासाठी आरोपींनी आरटीओकडे ५००० रुपये भरले होते.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ कन्हैयालालनने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. याचा राग मनात धरून दोन मुस्लिम व्यक्तींनी दुकानात घूसून कन्हैयालालची हत्या केली होती. या प्रकरणी मोहम्मद गौस आणि रियाझ अत्तारी या दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. कन्हैयालालची हत्या केल्यानंतर पळून जाण्यासाठी आरोपींनी द्या दुचाकीचा वापर केला होता. त्या दुचाकीचा नंबर आरजे २७ एएस २६११ असा आहे. या नंबरसाठी दोघांनी आरटीओकडे ५ हजार रुपये भरले होते.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण
२६११ म्हणजे २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आजही भारतात हा दिवस दु:खद दिवस म्हणून पाळला जातो. त्यामुळेच आरोपींनी हा क्रमांक आपल्या गाडीसाठी घेतला होता. या क्रमांकाबाबत अधिक तपास सुरु असल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.
पाहा व्हिडीओ –
आरोपीचे पाकिस्तानशी कनेक्शन
कन्हैयालालच्या हत्येतील मुख्य आरोपी मोहम्मद गौस आणि रियाझ यांचा पाकिस्तानशी संबध असल्याचे समोर आले आहे. हे दोघेही पाकिस्तानमधील व्यक्तीच्या संपर्कात होते आणि तिथूनच त्यांना भारतात दहशतवाद पसरवण्याच्या सूचना मिळत होत्या. २०१४ साली मोहम्मद गौस पाकिस्तानमध्ये गेला होता. हे दोन्ही आरोपी पाकिस्तानच्या दावत-ए-इस्लामी या इस्लामिक संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.