इझूम (युक्रेन) : रशियाकडून पुन्हा ताब्यात घेतलेल्या भागात सामान्य नागरिकांच्या छळाचे पुरावे सापडल्याचा दावा युक्रेनने केला. इथून जवळच एक मोठी दफनभूमी आढळून आली. यातील काही मृतदेह हात बांधलेल्या किंवा गळय़ाभोवती दोरखंड असलेल्या अवस्थेत आढळल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांना मदत करा’

इझूम शहरासह खारकीव्हचा बराचसा प्रदेश युक्रेनने रशियाकडून परत मिळवला आहे. तिथे अनेक सामुहिक दफनभूमी आढळून आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. जंगलात असलेल्या एका दफनभूमीत ४००पेक्षा जास्त मृतदेह आढळून आले असून बहुतांश मृतदेह सामान्य नागरिकांचे आहेत. यावरून युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियावर टीकेची झोड उठवली. ‘बुका, मारिओपोल आणि आता इझूममध्ये केवळ मृत्यू देऊन गेलेल्या रशियाला जबाबदार धरलेच पाहिजे,’ असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine says bodies in mass burial ground show torture signs zws