Don Amir Tipu Balaz Tarkanwala Murder : पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या धांदल संपते न संपते तोच रविवारी एक मोठी बातमी पाकिस्तानात झळकली. लाहोरमधला सर्वात मोठा डॉन अमीर टीपू बलाज टक्रांवालाच्या हत्येची. एका लग्नात त्याची हत्या करण्यात आली. लाहोरचा किंग अशी त्याची ओळख असलेल्या बिल्ला ट्रकांवलाच्या नातवाची हत्या करण्यात आली. आमीर ट्रकांवाला कुटुंबातल्या चौथ्या वारसाची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पाकिस्तानच्या अंडरवर्ल्डमध्ये गदारोळ माजला आहे.

१८ फेब्रुवारीला काय घडलं?

१८ फेब्रुवारी २०२४ ला लाहोरमध्ये एक लग्न होतं. त्यात लाहोरचा सर्वात देखणा डॉन आमीर ट्रकांवाला आला होता. त्याचा सर्वात जवळचा मित्र हमजाच्या बहिणीचं लग्न होतं. या लग्नात तो आला होता. अमीर ट्रकांवाला त्याच्या खास मित्रांसह आणि त्यांच्या भावांसह एका टेबलसमोर बसला होता. त्याच्या चारही बाजूला त्याचे बॉडी गार्ड होते. तेवढ्यात एक माणूस ट्रकांवाला जवळ आला आणि त्याच्यासह सेल्फी काढण्याची विनंती केली. दुसऱ्या क्षणी त्याने लपवलेलं हत्यार काढलं आणि आमीरवर गोळीबार केला. त्यानंतर तातडीने गोळीबार सुरु झाला. सुरक्षा रक्षकांनी उत्तरादाखल गोळीबार केला. यात एक हल्लेखोर मारला गेला तर दुसरा पळाला. आमीरला गोळ्या लागल्या. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आज तकने या विषयचीचं वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Underworld don ameer balaj tipu shot dead in pakistan lahore attacker also killed read inside story scj
First published on: 21-02-2024 at 17:55 IST