UPSC Civil Service Exam Result 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल मंगळवारी दुपारी जाहीर केला. त्यात इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला असून, अंतिम निकालात राज्यातील उमेदवारही यशवंत ठरले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुले आहेत. परीक्षेचा निकाल http//www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, केंद्रीय सेवा गट अ, गट ब अशा पदांसाठी नागरी सेवा परीक्षा २०२२ घेण्यात आली होती. यूपीएससीने जाहीर केलेल्या निकालात पहिल्या दहा क्रमांकामध्ये सहा मुली तर चार मुले आहेत. त्यात इशिता किशोर, गरिमा लोहिया, उमा हरती एन, स्मृती मिश्रा, मयूर हजारिका, गहना नव्या जेम्स, वसीम अहमद भट, अनिरुद्ध यादव, कनिका गोयल, राहुल श्रीवास्तव हे विद्यार्थी अनुक्रमे पहिल्या दहा क्रमांकावर आहेत.

हेही वाचा >> UPSC CSE Result 2022: देशात पहिली आलेल्या इशिता किशोरच्या मॉक इंटरव्ह्यूचा Video होतोय व्हायरल

एकूण प्रसिद्ध झालेल्या ९९३ नावांमध्ये पहिला टॉप टेनमध्ये सहा मुली आहेत. तर, राज्यातून ठाण्यातील कश्मिरा संखे प्रथम आली आहे. तर, वसंत दाभोळकरने (७६ वा क्रमांक), प्रतिक जराड (१२२), जान्हवी साठे (१२७), गौरव कायंदे-पाटील (१४६) तर ऋषिकेश शिंदे (१८३) उत्तीर्ण झाले आहेत.  

महाराष्ट्रातील विजेत्यांची नावे

१. कश्मिरा संख्ये (२५)
२. वसंत दाभोळकर (१२७)
३. गौरव कायंदे-पाटील (१४६)
४.ऋषिकेश शिंदे (१८३)
५. अभिषेक दुधाळ (२८७)
६. श्रुतिषा पाताडे (२८१)
७. स्वप्नील पवार (२८७)
८.अनिकेत हिरडे (३४९)

देशातील टॉप दहा उमेदवारांची यादी

१.इशिता किशोर
२.गरिमा लोहिया
३.उमा हरति एन
४.स्मृति मिश्रा
५.मयूर हजारिका
६.गहना नव्या जेम्स
७.वसीम अहमद
८.अनिरुद्ध यादव
९. कनिका गोयल
१०.राहुल श्रीवास्तव

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc civil services exam result 2022 declare ishita kishore secures air 1 women clinch top 4 ranks sgk