UPSC Results : यूपीएससीचे निकाल जाहीर; शुभम कुमार देशात पहिला, महाराष्ट्राची मृणाली जोशी ३६वी!

२०२० साली यूपीएससीकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यूपीएससीची वेबसाईट upsc.gove.in वर हे निकाल पाहता येणार आहेत.

UPSC-office

भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा अशा अनेक देशपातळीवरच्या परीक्षांसाठी अधिकाऱ्यांची निवड करणाऱ्या UPSC परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये शुभम कुमार देशात पहिला आला आहे. एकूण ७६१ उमेदवारांची यादी यूपीएससीकडून जाहीर करण्यात आली आहे. भोपाळच्या जागृती अवस्थीनं दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर अंकिता जैननं तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये जागृती देशात पहिली आली आहे. २४ वर्षीय जागृतीनं इंजिनिअरिंग केलं आहे. महाराष्ट्राची मृणाली जोशी देशात ३६वी आली असून विनायक नरवदे देशात ३७वा आला आहे. ९५व्या क्रमांकावर विनायक महामुनी आहे.

२०२० साली यूपीएससीकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यूपीएससीची वेबसाईट upsc.gove.in वर हे निकाल पाहता येणार आहेत. नियमाप्रमाणे वेबसाईटवर आत्ता फक्त निकाल पाहता येणार असून सविस्तर गुणपत्र १५ दिवसांत संकेस्थळावरच अपलोड केलं जाईल.

एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी २६३ उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आहेत. ८६ उमेदवार मागासवर्गातील, २२९ ओबीसी, १२२ अनुसूचित जाती तर ६१ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. याशिवाय १५० उमेदवार रिझर्व्ह यादीमध्ये आहेत. त्यामध्ये १५ आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील, ५५ ओबीसी, ५ अनुसूचित जाती तर एक उमेदवार अनुसूचित जमातीमधील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Upsc results 2020 list declared by commission shubham kumar tops pmw

फोटो गॅलरी