पाकिस्तानने अफगाणिस्तान व भारतात कारवाया करणाऱ्या अतिरेकी गटांना मोकळे रान देण्याचे धोरण बदललेले नाही, अशा शब्दांत अमेरिकेच्या पेंटॅगॉन या संरक्षण विभागाने पाकिस्तानला फटकारले आहे. विशेष म्हणजे,अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी हे भारत दौऱ्यावर येत असतानाच अमेरिकेने पाकिस्तानला कुठलीही लष्करी मदत दिली जाणार नाही असे सूचित केले आहे.