Illegal Immigration in US : भारतातील अमेरिकन दूतावासाने अमेरिकेतील भारतीयांवर कायमस्वरुपी बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या दूतावासाचे अधिकृत एक्स अकाऊंट, यूएस अम्बेसी इंडियावरून हा इशारा देण्यात आलाय. या महिन्यात भारतातील अमेरिकन दूतावसाने बेकायदा स्थलांतराबद्दल केलेली ही तिसरी ट्विटर पोस्ट आहे. या विशेष आणि वारंवार होणाऱ्या इशाऱ्यांमागील नेमके कारण काय आहे ते स्पष्ट झालेलं नाही. डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या अंतर्गत नवीन धोरण बदलानुसार ३० दिवसांपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना संघीय सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. अमेरिकन दूतावासाकडून देण्यात आलेल्या ताज्या चेतावणीत असं म्हटलं आहे की, जर तुम्ही तुमच्या अधिकृत मुक्कामाच्या कालावधीपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहिलात तर तुम्हाला हद्दपार केले जाऊ शकते आणि भविष्यात अमेरिकेत प्रवास करण्यावर कायमची बंदी येऊ शकते.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

व्हिसा फसवणुकीत दोषी आढळणाऱ्यांना कायमस्वरुपी बंदी

या महिन्याच्या सुरुवातीला भारतातील अमेरिकन दूतावासाच्या हँडलवरून आणखी एका संबंधित पोस्टमध्ये म्हटलं होतं की, अमेरिकन सरकारने फसवणुकीचा सामना करण्यासाठी आणि बेकायदेशीर इमिग्रेशन संपवण्यासाठी समन्वित आंतर एजन्सी प्रयत्न सुरू केले आहेत. व्हिसा फसवणुकीत दोषी आढळणाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश करण्यास कायमची बंदी घातली जाईल. बेकायदेशीर इमिग्रेशनला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती आणि परदेशी सरकरांना नवीन व्हिसा निर्बंध धोरण लागू होतात.

भारतीयांना थेट न संबोधता भारतीय दूतावासाने म्हटलं होतं की, अमेरिका स्थलांतर आणि ट्रान्झिट देशांच्या भागीदारीत देशांतर्गत आणि परदेशातील सीमा धोके कमी करण्यासाठी काम करत आहे. निर्वासितांना परत आणून बेकायदेशीर स्थलांतर रोखण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही आमच्या भागीदारांचे आभार मानतो, असंही त्यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us embassy in india issues warning of permanent ban on travelling to the united states sgk