इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धात अनेक सामान्य नागरिकांनाही ओलीस करण्यात आलं. यामुळे त्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, आता इस्रायल आणि हमासमधील वाटाघाटीत ओलीस ठेवण्यात आलेल्या नागरिकांना सोडून देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ओलिसांना सोडल्यानंतर त्यावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. इस्रायल आणि हमासमध्ये ४ दिवस युद्धविराम झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही प्रतिक्रिया आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जो बायडेन म्हणाले, “आज ओलिसांची होणारी सुटका ही केवळ प्रक्रियेची सुरुवात आहे. उद्या आणि त्यानंतरच्या आगामी काळात आणखी ओलीस नागरिकांची सुटका केली जाईल. ओलीस असलेले अनेक लोक यामुळे आपल्या कुटुंबाला भेटू शकतील. याशिवाय जे अद्यापही ओलीस आहेत आणि जे आमच्याकडे सुटकेसाठी आशेने पाहत आहेत तेही आमच्या लक्षात आहे. त्यांच्या सुटकेसाठीही आम्ही प्रयत्न करू.”

“दोन अमेरिकन महिला आणि एक ४ वर्षांचा मुलगा बेपत्ता”

“ओलीस असलेले लोक सुटकेनंतर त्यांच्या प्रियजणांना भेटत आहेत. याचं प्रत्येकाने कौतुक केलं पाहिजे. दोन अमेरिकन महिला आणि एक ४ वर्षांचा मुलगा बेपत्ता आहेत. आम्ही तोपर्यंत थांबणार नाही, जोपर्यंत ते ओलीस ठेवलेले लोक कोठे आहेत या घरच्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि ओलीस ठेवलेले लोक त्यांच्या घरी परत येत नाहीत,” असंही जो बायडेन यांनी नमूद केलं.

हेही वाचा : हमास ५० ओलिसांना सोडणार; इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये कोणता करार झाला?

“मी व्यक्तिगतपणे कतार, इजिप्त आणि इस्रायलच्या नेत्यांशी संपर्कात”

“मी व्यक्तिगतपणे कतार, इजिप्त आणि इस्रायलच्या नेत्यांशी संपर्कात आहे. तसेच युद्धविराम काळात ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या हस्तांतरणाबाबतच्या प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी होईल याचा पाठपुरावा करू,” असंही बायडेन यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us president joe biden comment on release of war hostages by hamas pbs