इस्रायल-हमास यांच्या दरम्यान युद्ध चालू झाल्यानंतर पहिल्यांदाच चार दिवसांचा विराम घेण्यात आला आहे. सहा आठवडे चाललेल्या घमासान युद्धानंतर इस्रायल आणि हमास यांच्यादरम्यान ओलिसांना सोडविण्यासंबंधी वाटाघाटी करार झाला आहे. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करून जवळपास २५० इस्रायली नागरिकांना हमासने बंदी बनविले होते. बंदी असलेल्या नागरिकांना सोडविण्यासाठी इस्रायलच्या मंत्रिमंडळाने वाटाघाटी करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी घडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इस्रायलचा सर्वात मोठा मित्र कतार यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. तर अमेरिका आणि इतर देशही वाटाघाटी घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील होते. या तात्पुरत्या वाटाघाटीमध्ये काय समाविष्ट आहे? याबाबतचा आढावा फर्स्टपोस्ट संकेतस्थळाने घेतला आहे.

इस्रायलच्या मंत्रिमंडळाने मंजूर केलेला वाटाघाटी करार काय आहे?

हमासने इस्रायलमधून पळवून नेलेल्या ५० ओलिसांना पुन्हा आणण्यासाठीच्या वाटाघाटी कराराला इस्रायलच्या मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. ओलिसांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. त्याबदल्यात इस्रायलने चार दिवस युद्धविराम करण्याचे वचन दिले आहे. इस्रायली सरकारने दिलेल्या निवेदनानुसार, चार दिवस जमिनीवर आणि हवेतून हल्ले केले जाणार नाहीत. “सर्व ओलिसांना सुरक्षितपणे घरी आणण्यास इस्रायली सरकार बांधिल आहे. हे लक्ष्य साध्य करण्याच्या पहिल्या टप्प्याच्या रूपरेषेला सरकारने मंजुरी दिली आहे. चार दिवस युद्धविराम दिला असताना या दिवसांत हमासकडून ५० ओलिसांना सोडण्यात येणार आहे, ज्यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश असेल”, अशी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची प्रतिक्रिया निवेदनात समाविष्ट करण्यात आली आहे.

Prajwal revanna diplomatic passport
प्रज्ज्वल रेवण्णा डिप्लोमॅटिक पासपोर्टच्या बळावर देशातून फरार; हा पासपोर्ट कोणाला मिळतो?
A rocket attack by Qassam Brigades of Hamas on the capital of Israel
इस्रायलच्या राजधानीवरच हमासच्या कासम ब्रिगेड्सकडून रॉकेटहल्ला… काय आहे कासम ब्रिगेड्स? त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे कशी?
Israeli Prime Minister Benjamin Netanyahu
नेतान्याहू- हमास म्होरक्यांच्या अटकेपेक्षा ‘मानवतेच्या कायद्या’ची चिंता…
Harassment Case Brijbhushan Sharan Singh
“मी गुन्हा केलाच नाही, तर गुन्ह्याची कबुली…”; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपावर ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया
thief revealed in front of vasai police committed 65 house burglaries
वसई : वय ३६ चोऱ्या केल्या ६५; अवलिया चोर पोलिसांच्या जाळ्यात
loksatta analysis Israel and Hamas delay in cease fire
विश्लेषण : इस्रायल आणि हमासदरम्यान युद्धविरामाला उशीर का? चर्चेचे घोडे नेमके कुठे अडते?
Ed Action Jharkhand
मंत्र्यांच्या नोकराच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे ढीग पाहून अधिकारीही चक्रावले!
Women Manipur violence Update
Manipur Violence : “पीडित महिला पोलिसांच्या वाहनात बसल्या, पण…”; नग्न धिंडप्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे

त्यानंतर प्रत्येक १० ओलिसांच्या सुटकेसाठी आणखी एक एक दिवस युद्धविरामाची घोषणा करण्यात येईल, असेही निवेदनात नमूद केले आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमासने २५० ओलिसांना ताब्यात घेऊन गाझापट्टीत नेले होते. ओलिसांपैकी, दोन अमेरिकन नागरिकांना सोडण्यात आले आहे. एकाला सुरक्षितरित्या बाहेर काढले गेले, तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

हमासच्या करारात काय आहे?

बुधवारी सकाळी (२२ नोव्हेंबर) हमासने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, वाटाघाटीचा एक भाग म्हणून इस्रायल त्यांच्या तुरुंगात असलेल्या १५० पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करणार आहे. कैद्यांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश असल्याचे हमासने म्हटले आहे. कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीने सदर वाटाघाटीचा करार पुर्णत्वास जात आहे. हमासनेही या कराराला मान्यता दिली. या करारानुसार, गाझापट्टीमध्ये मानवतावादी मदत आणणाऱ्या शेकडो ट्रकना प्रवेश दिला जाणार आहे. औषधे, वैद्यकीय वस्तू आणि इंधनाचा पुरवठा यानिमित्ताने गाझापट्टीत होणार आहे.

तथापि, इस्रायलच्या निवेदनात मात्र पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्यासंबंधीचा किंवा गाझापट्टीत ट्रकना प्रवेश देण्याबाबतचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. मध्यस्थीत सहभागी असलेल्या अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इस्रायलकडून पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्यात येणार आहे. पण त्यांनीही निश्चित आकडा जाहीर केला नाही.

करार कसा झाला?

ओलिसांच्या संभाव्य सुटकेवर इस्रायली मंत्रिमंडळाने तब्बल सहा तास बैठक घेतली. या कराराचे चालू युद्धावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यात आली. या कराराबाबत सर्वात आधी अतिउजवे अर्थमंत्री बेझलेल स्मोट्रिच यांनी चिंता व्यक्त केली. मात्र चर्चेअंती त्यांनी याला पाठिंबा दिला, अशी माहिती लष्कराचे कमांडर गॅल हिर्श यांनी दिली. दोन लोकांनी या कराराचा कडाडून विरोध केला. त्यापैकी एक आहेत. अतिउजवे राष्ट्री सुरक्ष मंत्री इटामार बेन-गवीर अशी माहिती सीएनएन या वृत्तसंस्थेने दिली.

हा करार पुर्णत्वास जाण्याआधी इस्रायल आणि हमास यांच्यात वाटाघाटी जमवून आणणे कठीण कार्य होते. “अनेक दिवस वादविवाद आणि वाटाघाटीसंबंधी चर्चा केल्यानंतर आम्ही चार दिवसांच्या मानवी युद्धविरामापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. कतार आणि इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी या वाटाघाटासाठी विशेष प्रयत्न केले”, असे हमासने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

कतारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले की, चार दिवसांचा मानवतावादी युद्धविराम घेण्यावर इस्रायल आणि हमासचे एकमत झाले आहे. कदाचित हा विराम आणखी वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी (दि. २१ नोव्हेंबर) नेतान्याहू यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही हा करार आणखी चांगला होण्यासाठी त्यांनी मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा करार आणखी चांगला करण्यात आला आहे.

अमेरिका आणि कतारने करारासाठी कोणती भूमिका वठवली?

ज्या दिवशी हल्ला झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशीच करार करण्यासंबंधीचा गृहपाठ करण्यास सुरुवात झाली होती. कतारच्या माध्यमातून हमासशी संपर्क साधता येईल, याबाबत अमेरिकेला पूर्ण विश्वास होता. २३ ऑक्टोबर रोजी दोन अमेरिकन नागरिकांची सुटका करण्यात आली, हे सर्वात कठीण मात्र महत्त्वाचे कार्य होते. या सुटकेनंतर बायडेन प्रशासनाला कतारच्या माध्यमातून हमासशी संवाद साधला जाऊ शकतो, याबद्दलचा आत्मविश्वास मिळाला, अशी माहिती सीएनएनने आपल्या बातमीत दिली. अमेरिकेच्या दोन नागरिकांची सुटका केल्यानंतर इतर ओलिसांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

इस्रायलतर्फे मोसादचे संचालक डेव्हिड बर्निया यांना वाटाघाटी करण्यासाठी नेमण्यात आले होते. तर अमेरिकेकडून सीआयए या गुप्तहेर संस्थेचे संचालक बिल बर्न्स यामध्ये सामील होते. इतर ज्यांनी वाटाघाटीत महत्त्वाची भूमिका बजावली ते होते, राज्य सचिव अँटोनी ब्लिंकन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन आणि त्यांचे सहकारी जॉन फिनर तसेच अमेरिकेचे मध्य पूर्वेतील दूत ब्रेट मॅकगर्क.

कतारचे प्रधानमंत्री मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी हे दोहा येथून हमासचे वरिष्ठ नेते इस्माईल हनीयेह यांच्या संपर्कात होते.

वाटाघाटीच्या पहिल्या टप्प्यात हमासने ५० ओलिसांची सुटका करण्याचे मान्य केले. पण ओलिसांची यादी देण्यास त्यांनी नकार दिला. ९ नोव्हेंबर रोजी सीआयएचे बिल बर्न्स यांनी कतारचे नेते आणि मोसादच्या बर्निया यांची दोहा येथे भेट घेऊन वाटाघाटी कराराच्या मजकूराची निश्चिती केली. पण तेव्हा हमासला ओलिसांमध्ये असलेल्या त्या ५० लोकांची नावे, माहिती देता आली नाही. तीन दिवसांनंतर बायडेन यांनी कतारच्या अमीर यांच्याशी फोनवरून संवाद साधत ५० ओलिसांची संपूर्ण माहिती जसे की, वय, लिंग आणि राष्ट्रीयत्व पुरविण्याची सूचना केली. माहिती प्राप्त झाल्याशिवाय करारात पुढे जाता येणार नाही, असेही त्यांनी सांगतिले.

अखेर हमासने ओलिसांची माहिती देण्याची अट मान्य केली. १४ नोव्हेंबर रोजी बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी संवाद साधून या करारावर शिक्कामोर्तब करण्यास सांगितले. नेतान्याहू यांनी अखेर हा करार करण्यास मान्यता दिली.