अमेरिका आणि चीन यांच्यातलं सख्य आणि पराकोटीची स्पर्धा सर्वश्रुत आहे. अमेरिका जागतिक महासत्ता असून चीनला अमेरिकेच्याही पुढे जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे चीन व अमेरिका यांच्यातील उघड पण अघोषित स्पर्धा व त्याचा द्विपक्षीय संबंधांवर होणारा परिणाम या गोष्टी नेहमीच चर्चेत असतात. पण आता जागतिक महासत्ता होण्यातली दोन्ही राष्ट्रांमधली स्पर्धा दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या मिश्किल संवादातूनही समोर येऊ लागली आहे! याला निमित्त होतं या दोघांच्या नुकत्याच झालेल्या भेटीचं!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या अनेक महिन्यांपासून जो बायडेन व शी जिनपिंग यांच्या भेटीची जागतिक स्तरावर जोरदार चर्चा दिसून आली. जागतिक स्तरावरील अनेक महत्त्वाच्या व गंभीर मुद्द्यांवर दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा होणं अपेक्षित होतं. दिल्लीत झालेल्या जी-२० परिषदेला शी जिनपिंग गैरहजर राहिल्यामुळे ही चर्चा होऊ शकली नाही. त्या पार्श्वभूमीवर कॅलिफोर्नियामध्ये झालेली ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. मात्र, भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचे मुद्दे जरी बाहेर येऊ शकले नसले, तरी बैठकीनंतर त्यांच्या कारबाबत दोघांमध्ये झालेल्या मिश्किल चर्चेचा व्हिडीओ मात्र व्हायरल होऊ लागला आहे.

नेमकं काय घडलं?

अमेरिकेच्या दौऱ्यावर असणाऱ्या शी जिनपिंग यांनी कॅलिफोर्नियात जो बायडेन यांची भेट घेतली. या भेटीनंतर जो बायडेन स्वत: शी जिनपिंग यांना सोडण्यासाठी त्यांच्या कारपर्यंत आले. जिनपिंग यांची कार पाहाताच बायडेन यांनी “ही खूप सुंदर कार आहे”, असं म्हणत कौतुक केलं. त्यावर शी जिनपिंग यांनी लागलीच चायनिज भाषेत “ही माझी रेड फ्लॅग कार आहे”, असं सांगितलं. दुभाषकानं त्याचं भाषांतर करू सांगितल्यानंतर बायडेन यांनी त्यावर स्मितहास्य केलं.

सायप्रसच्या ‘सुवर्ण पारपत्र’धारकांमध्ये विनोद अदानी, पंकज ओस्वाल

पुढे जिनपिंग कारमध्ये बसण्याआधी जो बायडेन यांनी त्यांना त्यांच्या कारबद्दल सांगितलं. “तुम्हाला माहितीये ते माझ्या कारला काय म्हणतात? द बीस्ट”. पुन्हा दुभाषक महिलेनं याचं भाषांतर शी जिनपिंग यांना करून सांगताच त्यांनीही हसून त्याला दाद दिली.

या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायकरल होत असून दोन्ही देशांमधील स्पर्धेच्या चर्चेप्रमाणेच त्यांच्या राष्ट्रप्रमुखांच्या कार्सचीही आता चर्चा होऊ लागली आहे!

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us president joe biden xi jinping car discussion viral on social media they call it the beast pmw