माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजिंदर कुमार धवन (वय ८१) यांचे सोमवारी सांयकाळी निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतील बी एल कपूर रूग्णालयात उपचार सुरू होते. सांयकाळी सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी राज्यसभा सदस्य असलेले आर के धवन हे माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. गत मंगळवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

धवन यांच्या मृत्यूवर काँग्रेसने शोक व्यक्त केला आहे. पक्षाने अत्यंत मौल्यवान सदस्य गमावला आहे, असे ट्विट काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. काँग्रेसचे माध्यम समन्वयक रणदीप सुरजेवाला यांनी धवन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. काँग्रेस त्यांचे योगदान कधीच विसरू शकणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे३

धवन यांनी इंदिरा गांधी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून १९६२ मध्ये आपली कारकीर्द सुरू केली. इंदिरा गांधी यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत म्हणजे १९८४ पर्यंत ते त्यांच्याबरोबर होते. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीयांमध्ये अंबिका सोनी आणि कमलनाथ यांच्यासह धवन यांचाही समावेश होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran congress leader rk dhawan passes away at