युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा मानद तायक्वांदो ब्लॅक बेल्ट काढून घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधून देशाला निलंबित केल्यानंतर आता पुतिन यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. जागतिक तायक्वांदो संघटनेने ‘विजयापेक्षा शांतता अधिक महत्त्वाची’ असल्याचं सांगत पुतिन यांच्यावर कारवाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


जागतिक तायक्वांदो संघटनेने, “विजयापेक्षा शांतता अधिक मौल्यवान आहे” या ब्रीदवाक्याचा हवाला देत युक्रेनमधील रशियन लष्करी कारवाईचा निषेध केला आणि म्हटले की, निरपराध जीवांवरचे क्रूर हल्ले या खेळाच्या आदर आणि सहिष्णुतेच्या मूल्यांचे उल्लंघन करतात. या संदर्भात, जागतिक तायक्वांदोने नोव्हेंबर २०१३ मध्ये व्लादिमीर पुतिन यांना प्रदान केलेला मानद ९ वा डॅन ब्लॅक बेल्ट काढून घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं प्रशासकीय मंडळाने एका निवेदनात म्हटलं आहे.

युद्धविषयक ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.


आंतरराष्ट्रीय ज्युडो फेडरेशनने रविवारी पुतीन यांचा मानद अध्यक्ष आणि राजदूत म्हणून असलेला दर्जा युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्ध संघर्षामुळे निलंबित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. FIFA आणि UEFA सारख्या इतर क्रीडा संघटनांनी रशियन राष्ट्रीय संघ आणि क्लबला स्पर्धेतून निलंबित केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vladimir putin stripped of black belt over ukraine invasion vsk