बंगळुरूमधील एका उद्यानात विनयभंगाचा प्रयत्न करणाऱया नराधमाचा पाठलाग करीत भररस्त्यात त्याला चोप देऊन एका महिलेने स्वत:तील बळ एकवटून अशा नराधमांविरुद्ध कसा संघर्ष करावा, याचा संदेश दिला.
या व्हिडिओ फुटेजमध्ये वीणा चिंद्लुर ही महिला तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱया नराधमाचा पाठलाग करते आणि मोठ्या हिंमतीने त्याला खडेबोल सुनाविण्यास सुरूवात करते. प्रकार लक्षात येताच आणखी एक महिला आपल्या मोबाईलचा कॅमेरा चालू करून नराधमाला टिपण्याचा प्रयत्न सुरू करते. आपला व्हिडिओ काढला जात असल्याचे नराधमाच्या लक्षात येताच चेहरा लपवत नराधम पळ काढण्याचा प्रयत्नात दिसतो. मात्र, त्याला थांबवून गुडघ्यांवर बसण्यास भाग पाडले जाते आणि एक जोरदार लाथ हाणून धडा शिकविला जातो.
मिळालेल्या माहितीनुसार, वीणा या दररोज सकाळी फेरफटक्यासाठी उद्यानात गेल्यावर सूर्यप्रकाश (३०) हा नराधम चित्रविचित्र हातवारे आणि आवाज काढून त्रास देत असे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch video bangalore woman chases kicks molester