जगभरात लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअॅपने या वर्षाअखेर ब्लॅकबेरी ओएसच्या सर्व फोनना सपोर्ट करणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये ब्लॅकबेरीचा लेटेस्ट व्हर्जन ब्लॅकबेरी १०चाही समावेश आहे.
व्हॉट्सअॅप बंद होणा-या स्मार्टफोनमध्ये केवळ ब्लॅकबेरीचाच समावेश नाही. तर यात नोकियाची एस ४० सीरीज, नोकिया सिम्बियन एस ६०, अॅन्ड्रॉइट २.१, अॅन्ड्रॉइट २.२ आणि विंडोज फोन ७.१चा ही समावेश आहे. म्हणजेच पुढील वर्षापासून हे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. व्हॉट्सअॅपने एक ब्लॉग प्रसिद्ध करून यासंबंधीची माहिती दिली. २००९ साली व्हॉट्सअॅप या मॅसेजिंग सर्व्हिसची सुरुवात झाली होती. त्यानंतर यात अनेक बदल होत गेले. भविष्यातही व्हॉट्सअॅपमध्ये आणखी काही बदल होणार असून सदर स्मार्टफोनच्या सिस्टीम या त्याला सपोर्ट करण्यासाठी पुरेशा नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ब्लॉगवर म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Feb 2016 रोजी प्रकाशित
Whatsapp : २०१७ मध्ये व्हॉट्स अॅप होणार बंद
व्हॉट्सअॅपने एक ब्लॉग प्रसिद्ध करून यासंबंधीची माहिती दिली.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 28-02-2016 at 15:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp will be discontinued on blackberry and nokia operating systems by