रशियात वॅग्नर या खासगी लष्कराने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. वॅग्नर या लष्कराची निर्मिती पुतिन यांनीच केली आहे. येवगिनी ग्रिगोझीन हे वॅग्नर लष्कराचे प्रमुख आहेत. पुतिन यांचे आचारी या नावाचे येवगिनी ग्रिगोझीन यांची ओळख आहे. पण, अलीकडील काही दिवसांपासून पुतिन आणि ग्रिगोझीन यांच्यात सतत खटके उडत आहेत.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात युक्रेनच्या सैन्याने रशियावर हल्ला केला, तेव्हा पुतिन यांना मोठा धक्का बसला होता. त्यावेळी येवगिनी ग्रिगोझीन यांनी वॅग्नर लष्कराच्या साहाय्याने युक्रेनी सैन्याशी सामना केला. आणि रशियाचे नायक बनले. युक्रेनच्या बखमुत शहराचा ताबा मिळवण्यासाठी वॅग्नर लष्कराने महत्वाची भूमिका बजावली होती. तर, आपण येवगिनी याच्याबद्दल जाणून घेणार आहोत…

हेही वाचा : वॅग्नर लष्कराच्या बंडानंतर व्लादिमीर पुतिन आक्रमक; इशारा देत म्हणाले…

पुतिन यांचे आचारी अशी ओळख असणारे येवगिनी ग्रिगोझीनाचा जन्म १९६१ साली लेनिनग्राड येथे झाला. २० व्या वर्षीच ग्रिगोझीनावर मारहाण, चोरी आणि फसवणुकीसारखे आरोप लागले होते. याप्रकरणात दोषी आढळल्यानंतर न्यायालयाने ग्रिगोझीनला १३ वर्षाची शिक्षा सुनावली. पण, ९ वर्षाच्या शिक्षेनंतर ग्रिगोझीनला सोडून देण्यात आलं.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ग्रिगोझीनने पीटर्सबर्ग येथे हॉट डॉग विकण्याचा स्टॉल सुरु केला. यात यशस्वी झाल्यानंतर ९० च्या दशकात सर्वात महाग रेस्टाँरंट ग्रिगोझीनने सुरु केलं. हे रेस्टाँरंट एवढे प्रसिद्ध झाले की, रांगेत उभे राहून लोक वाट पाहू लागले. तर, रशियाचे राष्ट्रपती पुतिन विदेशी पाहुण्यांना या रेस्टाँरंटमध्ये जेवणासाठी आणत असे.

तेव्हाच येवगिनी ग्रिगोझीनाची पुतिन यांच्याशी जवळीकता वाढली. येवगिनी ग्रिगोझीनची भूमिका नेहमी संशयित राहिली आहे. विदेशात येवगिनी ग्रिगोझीनला पुतिनचा उजवा हात समजले जाऊ लागले. रशियन सैन्याबरोबर येवगिनी ग्रिगोझीनने खाजगी वॅग्नर लष्कर स्थापन केलं. पण, मागील वर्षीच वॅग्नरचे लष्करप्रमुख म्हणून समोर आले. आफ्रिकेत रशियाचा प्रभाव वाढवण्यासाठी वॅग्नर लष्कराचा मोठा हात आहे.

२०१७ नंतर वॅग्नर लष्कराने माली, सूदान, मध्य आफ्रिका, लीबिया आणि मोजाम्बिक येथे सैन्याला तैनात केलं. वॅग्नर लष्कराने येथे राजकीय आणि आर्थिक ताकद वाढवली. वॅग्नर लष्कराला जसे श्रेय मिळू लागले, तसे रशियन सैन्यावर येवगिनीने टीका करण्यास सुरुवात केली. तर, वॅग्नर लष्कराला रशियन सैन्याच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्नांना पुतिन यांनी समर्थन दिलं.

हेही वाचा : विश्लेषण: ‘वॅग्नर ग्रुप’चा भस्मासुर रशियावरच उलटणार? भाडोत्री लष्कराचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ!

पण, येवगिनीने यास स्पष्ट नकार दिला. रशियातील अधिकाऱ्यांचे अपहरण करण्याचे आदेश येवगिनीने लष्कराला दिले. तज्ञ्जांनी दिलेल्या माहितीनुसार, येवगिन पुतिन यांची सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करत आहेत.