UP Doctor Case : उत्तर प्रदेशमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका सरकारी डॉक्टरवर त्याच्याच पत्नीने तो ट्रान्सजेंडर महिला बनून ऑनलाईन लैंगिक चाळे करत, त्याच्या माध्यमातून पैसे कमावल्याचा आरोप केला आहे. दरम्यान या सरकारी नोकरदार असलेल्या या डॉक्टरवर त्याच्या पत्नीनेच असे गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान या डॉक्टरने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत

सध्या पत्नीने आरोप केल्याने वादात सापडलेल्या हे डॉक्टर सरकारी वैद्यकीय अधिकारी आहेत आणि सरकारी निवासस्थानात राहतात. या डॉक्टरांच्या पत्नीने उघडपणे आरोप केला आहे की, हे डॉक्टर पॉर्नोग्राफीक व्हिडीओ तयार करून त्यांची विक्री करत होते. इतकेच नाही तर या अश्लील व्हिडीओंमध्ये ते ट्रान्सजेंडर महिला असल्याचे दाखवून, स्वतः बिकीनी घालून काम करत होते. तसेच अनेकदा त्यांच्याबरोबर इतर पुरूष देखील असत. तसेच त्यांनी व्हिडीओमध्ये दिसणारे घरातील फर्निचर आणि एक्सेसरीजच्या हवाल्याने हे व्हिडीओ त्यांच्या घरात चित्रित करण्यात आले असल्याचा दावा केला आहे. न्यूज१८ यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

डॉक्टरांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार असा एक व्हिडीओ ऑनलाईन फिरत होता आणि काही काळातच तो व्हायरल झाला, ज्यामुळे हा एकंदरीत सर्व प्रकार उजेडात आला. व्हिडीओमध्ये दिसणारा पती आणि घरातील इतर साहित्य ओळखू आल्यानंतर १८ मे रोजी त्यांनी पतीला याबद्दल जाब विचारला. त्यानंतर दोघांमध्ये यावरून चांगलाच वाद झाला आणि हा वाद वाढत जाऊन पुढे हिंसक बनला, त्यानंतर या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना हस्तक्षेप करावा लागला. डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीचे वडील आणि भाऊ यांच्यातील वादाचा व्हिडीओ देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

तेव्हापासून या प्रकरणात पोलिसांकडून तपास केला जात आहेत. पोलिसांनी डॉक्टराचे सरकारी निवासस्थान सील केले आहे आणि व्हिडिओ मटेरियल फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यामध्ये व्यभिचार, मानसिक क्रूरता आणि शारीरिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात एक उच्चस्तरीय विभागीय चौकशी देखील केली जात आहे. तसेच व्हिडीओची सत्यता देखील तपासली जात आहे.

डॉक्टरचे म्हणणे काय?

डॉक्टरने त्याच्यावर करण्यात आलेले आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत. तसेच त्यांनी दावा केला आहे की हे व्हिडीओ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने डिपफेक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आले आहेत. तसेच त्यांनी दावा केला आहे की. हा सर्व एका सुनियोजित बदनामी करण्याच्या कटाचा भाग आहे, आणि हे तंत्रज्ञान कसं वापरावं याचं ज्ञान असलेल्या त्यांच्या पत्नीच्या कुटुंबातील लोकांनीच कदाचित हा कट रचला असेल, असेही त्यांनी म्हटले आहे

“मी पूर्णपणे निर्दोष आहे,” असे डॉक्टरने पोलिसांना सांगितले, तसेच त्यांनी त्यांच्यावरील आरोप खोडून काढण्यासाठी प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी देखील केली आहे. हे व्हिडीओ बनावट आहेत आणि एका कटाच्या माध्यमातून माझं आयुष्य आणि करियर उद्ध्वस्त केले जात आहे, असेही ते म्हणाले आहेत.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना याची स्थानिक नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. या प्रकरणात कायदेशीर तज्ञांचे म्हणणे आहे की जर व्हिडीओ तयार करण्यासाठी डीपफेक वापरल्याचा दावा खरा असेल तर एखाद्या घरगुती वादात अशा अडव्हान्स डिजिटल मॅनिप्युलेशन वापरले जाण्याची ही एक दुर्मिळ घटना असेल.