will apply rule of majority say election commission chief rajiv kumar on supreme court allow hear ec shinde vs shivsena ssa 97 | Loksatta

Thackeray vs Shinde: आता खेळ बहुमताचा? निवडणूक आयोगाने सांगितलं ‘खरी शिवसेना’ कोणाची हे कसं ठरवणार

EC Rajiv Kumar On Shivsena : शिवसेना कोणाची याचा निर्णय आता निवडणूक आयोग घेणार आहे. त्यात आता निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Thackeray vs Shinde: आता खेळ बहुमताचा? निवडणूक आयोगाने सांगितलं ‘खरी शिवसेना’ कोणाची हे कसं ठरवणार
राजीव कुमार ( इंडियन एक्सप्रेस फोटो )

सर्वोच्च न्यायालयाने ‘धनुष्यबाण’ पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ‘धनुष्यबाण’ हे शिवसेनेचं चिन्ह कोणाला मिळणार, याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. मात्र, खरी शिवसेना कोणाची आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह कोणाला मिळणार, याबाबत निवडणूक आयोग कशाच्या आधारे निर्णय घेणार, असा प्रश्न पडला आहे. त्यात आता निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राजीव कुमार म्हणाले, “शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता द्यावी अथवा चिन्हावरती निर्णय देताना पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. शिवसेनेच्या बाबतीत ‘बहुमताच्या आधारे’ चाचपणी करून निर्णय घेतला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल वाचल्यानंतर यावरती कारवाई करू,” असेही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

शिवसेनेची याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावत, शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यापासून रोखलं जावं, अशी मागणी ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. यामुळे आता निवडणूक आयोगालाच ‘खरी शिवसेना कोण’ हा निर्णय घ्यावा लागणार आहे

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंना धक्का दिल्यानंतर पुतण्या म्हणतो; “एकनाथ शिंदेंचा गटच…”

संबंधित बातम्या

Himachal Pradesh Election Results 2022 Live : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, बहुमताचा आकडा केला पार, अखरेचे कल आले हाती
Gujarat Election Results 2022 Live: जनतेच्या आशीर्वादामुळेच भाजपाचा विजय, पंतप्रधान मोदींनी मानले आभार; वाचा प्रत्येक अपडेट
हिमाचल प्रदेश निवडणुकीवरून अजित पवारांचा नड्डांना खोचक टोला; म्हणाले, “जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांना…”
Gujarat Election Result 2022 : गुजरातमधील दारूण पराभवानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, “कठोर परिश्रम करू आणि…”
गुजरातच्या निकालावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “एका राज्याच्या सोईचे…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘पुणे बंद’ला व्यापाऱ्यांचा पाठिंबा
गुजरात निवडणुकीनंतर ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, अरविंद केजरीवालांनी मानले जनतेचे आभार; म्हणाले, “आम्ही केवळ…”
“देशासमोर आव्हानं असताना, जनतेचा विश्वास भाजपावर”, पंतप्रधानांची मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी कधीच काँग्रेसला…”
Viral Video: काही सेकंदातच कोमोडो ड्रॅगनने हरणाला गिळलं, शेवटचा क्षण पाहिल्यानंतर अंगावर काटा येईल
पुणे : विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत बदली स्थगितीच्या निर्णयाला विरोध